Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

Philips 5G: फिलिप्स त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या नावाची अधिकृतपणे घोषणा केली नाही. फिलिप्सच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी सर्वजण उत्सुक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 01, 2026 | 11:50 AM
अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

Follow Us
Follow Us:
  • Philips उद्या, 2 सप्टेंबरला भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
  • फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, 8GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज आणि 64MP एआय कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • IP64 रेटिंग, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि 16MP फ्रंट कॅमेऱ्यासह फोनच्या फीचर्सची उत्सुकता वाढली आहे.
भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता फिलिप्स सज्ज झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या कंपनी भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप त्यांच्या नवीन स्मार्टफोनची घोषणा केली नाही. मात्र ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर आगामी स्मार्टफोनसाठी एक खास मायक्रोसाईट जारी करण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनची लाँच डेट आणि काही फीचर्सबाबत माहिती मिळणार आहे. जर तुम्ही आता नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही काही वेळ प्रतिक्षा करू शकता. कारण येत्या काही तासांत नवीन फिलिप्स स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.

BSNL Sim Offer: काय सांगता! फक्त 1 रुपया खर्च करा अन् मिळवा BSNL सिम; कंपनीच्या नवीन ऑफरने उडवली ग्राहकांची झोप

फिलिप्स 5G स्मार्टफोनचे अपेक्षित फीचर्स

डिस्प्ले

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनच्या फीचर्सवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, हा स्मार्टफोन बाजारात आधीपासूनच असलेल्या स्मार्टफोन्सना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीच्या या आगामी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे, जो स्क्रॉलिंग आणि गेमिंगचा अनुभव अधिक चांगला करणार आहे. फिलिप्स 5जी स्मार्टफोन 6GB आणि 8GB रॅम ऑप्शनमध्ये लाँच केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच, स्टोरेजसाठी या स्मार्टफोनमध्ये 128GB आणि 256GB पर्याय मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य: X) 

रंग पर्याय

ॲमेझॉनवरून समोर आलेल्या माहितीनुसार असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन ब्लॅक, ग्रे आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांत लाँच करू शकते. तसेच कंपनीने अद्याप या स्मार्टफोनच्या कलर ऑप्शनची अधिकृत नावे देखील जाहिर केली नाही. फोनच्या रिअर पॅनलवर वरच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात वर आलेला कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळेल. कंपनीने अद्याप त्यांच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव अधिकृतपणे जाहिर केले नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन लिस्टिंगमध्ये हा स्मार्टफोन फिलिप्स S7221 नावाने स्पॉट करण्यात आला आहे.

कॅमेरा

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेंसर व्हर्टिकल पद्धतीने सेट करण्यात आले आहेत आणि यासोबतच यामध्ये एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये गोलाकार कोपरे आणि खालील बाजूला फिलिप्सची ब्रँडिंग पाहायला मिळणार आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला होल-पंच डिझाईनवाला डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याच्या चारही बाजूला पातळ बेजल्स पाहायला मिळत आहेत.

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेलचा AI-पावर्ड रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. आगामी डिव्हाईसमध्ये अधिक चांगल्या ऑडिओ अनुभवासाठी डुअल स्टीरियो स्पीकर्स आणि अल्ट्रा मॅक्स ऑडिओचा सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय, या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP64 रेटिंग दिली आहे.

Web Title: Philips 5g smartphone launch tomorrow in india with 120hz display 64mp camera and 8gb ram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक
1

दिवाळीआधी Samsung ची मोठी घोषणा! टीव्ही खरेदीवर मोफत साउंडबार, २०% पर्यंत कॅशबॅक

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात
2

HP ZBook Ultra G3a: डिझाइनर्स, इंजिनिअर्स आणि क्रिएटर्ससाठी खुशखबर! HP चा नवा AI लॅपटॉप बाजारात

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस
3

Nothing Smart Glasses: चष्माच बनेल AI असिस्टंट! ChatGPT सोबत ‘ही’ कंपनी आणतेय स्मार्ट ग्लासेस

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा
4

भारतामध्ये DTH कंपन्यांना मोठा धक्का; वर्षभरात ७५ लाख ग्राहकांनी फिरवली, आकडेवारीतून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.