Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता

निर्मला सीतारमण यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत देशातील बँकिंग सुरक्षेबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. प्रगत AI मॉडेलमुळे सायबर हल्ल्यांचा धोका वाढत असून बँकांना वेळीच योग्य निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 12:37 PM
बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता

बँक खात्यांची सुरक्षा धोक्यात? निर्मला सीतारमण यांनी दिला इशारा, AI मुळे वाढली चिंता

Follow Us
Follow Us:
  • ‘क्लॉड माइथोस’सारख्या प्रगत AI मुळे बँकिंग सायबर हल्ल्यांचा धोका झपाट्याने वाढत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • अर्थमंत्र्यांनी बँकांना IT सिस्टम मजबूत करून ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • सायबर धोके टाळण्यासाठी बँका, CERT-In आणि इतर संस्थांमध्ये समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत देशातील अनेक मोठ्या बँकांचे प्रमुख सहभागी झाले होते. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. अँथ्रोपिकच्या क्लाउड मिथोस एआय मॉडेलशी संबंधित सायबरसुरक्षा धोके समजून घेणे हा निर्मला सीतारमण यांनी बोलावलेल्या बैठकीचा उद्देश होता. AI मॉडेलला सायबर सुरक्षेच्या दृष्टीने प्रगत मानले जात असतानाच ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानुसार, हा धोका सामान्य नाही आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी अधिक दक्षता, पूर्वतयारी आणि सर्व संस्थांमध्ये उत्तम समन्वयाची आवश्यकता आहे.

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

क्लॉड माइथोस AI काय आहे?

क्लॉड माइथोस हे अँथ्रोपिकचे आतापर्यंतचे सर्वात पावरफुल AI मॉडेल मानले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे मॉडेल सायबर सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सक्षम आहे आणि यामुळे ते सामान्य लोकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकत नाही. असं सांगितलं जात आहे की, या एआय मॉडेलने हजारो अशा सुरक्षा त्रुटी शोधल्या आहेत, ज्या अनेक वर्षांत मानवांना देखील शोधता आल्या नाहीत. यामधील काही त्रुटी 27 वर्षे जुन्या होत्या. या त्रुटी मोठ्या ऑपरेटिंग सिस्टम आणि वेब ब्राउजरमध्ये होत्या. या त्रुटींमुळे सायबर अटॅक होण्याची आणि डेटा चोरीला जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती.  (फोटो सौजन्य – X) 

Union Minister for Finance and Corporate Affairs Smt. @nsitharaman today chaired a high-level meeting, along with Union Minister for Electronics and Information Technology, Railways and I&B Shri @AshwiniVaishnaw, with Scheduled Commercial Banks and key stakeholders to assess the… pic.twitter.com/TrQrDCkMKE — Ministry of Finance (@FinMinIndia) April 23, 2026

अँथ्रोपिकचे क्लॉड माइथोस सध्या काही निवडक कंपन्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल सारख्या टेक कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, अहवालानुसार काही अनधिकृत यूजर्सनी सिस्टीममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही एक मोठी चिंतेची बाब आहे. कारण यामुळे सायबर सुरक्षेतील त्रुटींचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या टेक कंपन्यांमधील माहिती चोरुन त्यांचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने काय ठरवलं?

हा मुद्दा केवळ भारतापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, अमेरिका सरकार देखील AI मॉडेलबाबत सतर्क आहे आणि त्यांनी वॉल स्ट्रीट बँकांसोबत याबाबत संभाषण करण्यास देखील सुरुवात केली आहे. सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी व्हाईट हाऊस देखील आपल्या संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहे.

भारत सरकार कोणती तयारी करते?

भारत सरकार या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी एक मजबूत फ्रेमवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. याचा उद्देश असा आहे की, कोणत्याही सायबर हल्ल्याची ओळख पटवणं आणि वेळीच त्यावर कारवाई करणं. बैठकीत अर्थमंत्र्यांनी बँकांना त्यांचे आयटी सिस्टिम मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची पाऊलं उचलण्यास सांगितली आहे. बँकांमध्ये धोक्याची तात्काळ माहिती एकमेकांना देण्यासाठी एक प्रणाली स्थापित करण्यावरही भर देण्यात आला.

BGMI Cricket League Event: क्रिकेटप्रेमींसाठी गेमिंगमध्ये धमाका! स्पिन करून जिंका जबरदस्त रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

एकत्र येऊन काम करण्यावर भर द्या

अर्थ मंत्रालयाने असा सल्ला दिला आहे की, बँका, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक आणि इतर संस्थांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण केला पाहिजे. यामुळे कोणत्याही धोक्याची लवकर ओळख पटू शकते आणि सर्व संस्थांना सतर्क केले जाऊ शकते. इंडियन बँक्स असोसिएशनला देखील अशी एक प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे की, जे कोणत्याही सायबर धोक्याला त्वरित प्रतिसाद देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया क्लाउड मिथोसमुळे भारतीय वित्तीय क्षेत्राला निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्याचा सखोल अभ्यास करत आहेत.

Web Title: Ai threat alert nirmala sitharaman warns banks over rising cybersecurity risks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Ashwini Vaishnav
  • Nirmala Sitharaman
  • Tech News

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
2

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
3

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
4

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.