Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या

अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आयफोन डुओच्या स्क्रीनवर समस्या निर्माण झाली आहे. याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आता अशाच आयफोन यूजर्सना दिलासा देण्यासाठी ॲपलने एक मोठी घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 28, 2026 | 10:19 AM
Apple ची मोठी घोषणा! 'या' फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन... काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Apple ची मोठी घोषणा! 'या' फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन... काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • आयफोन डुओबाबत सतत तक्रारी समोर येत आहेत
  • यूजर्सना डिव्हाईसच्या इनर डिस्प्लेवर क्रॅक दिसला
  • तक्रारींचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
टेकजायंट कंपनी ॲपलने अलीकडेच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला होता. कंपनीचा हा आयफोन मॉडेल आयफोन डुओ या नावाने लाँच करण्यात आला होता. आयफोन डुओ हा कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन असल्याने ग्राहक हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. खरं तर लाँचिंगपूर्वीच या डिव्हाईसची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. तसेच, लाँचिंगनंतर देखील या डिव्हाईससाठी एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. मात्र आता या डिव्हाईसबाबत सतत तक्रारी समोर येत आहेत. डिव्हाईसच्या स्क्रीनबद्दल यूजर्स सतत तक्रार करत आहेत.

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

ॲपलने देखील स्विकारली समस्या

काही रिपोर्ट्सनुसार, यूजर्सना डिव्हाईसच्या इनर डिस्प्लेवर क्रॅक दिसला आहे. काही प्रकरणे अशी देखील आहेत, ज्यामध्ये फोन पहिल्यांदा उघडल्यानंतर आणि काही वेळ वापरल्यानंतर यूजर्सना समस्यांचा सामना करावा लागला. या तक्रारींचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. आता अखेर ॲपलने देखील काही डिव्हाईसच्या स्क्रीनमध्ये येणाऱ्या या समस्यांचा स्विकार केला आहे.  (फोटो सौजन्य: X) 

यूजर्सना मिळणार दिलासा

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, फोनची स्क्रीन ज्या ठिकाणी फोल्ड होते, तिथे सर्वाधिक समस्या येत असल्याचे पाहायला मिळत आहे. डिव्हाईसच्या या भागाला सेंट्रल हिंज असं म्हटलं जातं. डिव्हाईसचा हा भाग अतिशय महत्त्वाचा असतो. कारण फोनची स्क्रीन वारंवार ओपन करणं आणि बंद केल्यानंतर याच ठिकाणी फोल्ड होते. हीच समस्या महागड्या आयफोन डुओमध्ये निर्माण झाल्याने यूजर्स चिंतेत आहेत. मात्र आता या समस्येचा सामना करणाऱ्या यूजर्सना दिलासा देत ॲपलने एक मोठी घोषणा केली आहे.

ॲपलने केली मोठी घोषणा

ॲपलने सांगितलं आहे की, त्यांनी अलीकडेच लाँच केलेल्या आयफोन डुओच्या काही युनिट्सच्या इनर डिस्प्लेमध्ये समस्या पाहायला मिळाल्या आहेत. कंपनीचं असं म्हणणं आहे की, सध्या ही समस्या काही डिव्हाईसमध्ये समोर आली आहे. मात्र अशा यूजर्सना दिलासा देण्यासाठी ॲपलने खराब डिव्हाईस रिप्लेस करून नवीन डिव्हाईस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

आयफोन डुओमध्ये समस्या येत असल्यास काय करावे?

जर तुमच्या आयफोन डुओच्या इनर स्क्रीनवर क्रॅक दिसत असेल किंवा डिस्प्लेमध्ये इतर कोणती समस्या येत असेल तर लवकरात लवकर ॲपल केअरला संपर्क साधा. कंपनीने बाधित यूजर्सना रिप्लेसमेंटसाठी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, रिप्लेसमेंटच्या अटी आणि पात्रता ॲपल केअरद्वारे निश्चित केली जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple iPhone Duo मध्ये कोणती समस्या समोर आली आहे?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, काही iPhone Duo युनिट्सच्या इनर डिस्प्लेवर क्रॅक दिसत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

  • Que: iPhone Duo च्या स्क्रीनमध्ये क्रॅक कुठे दिसत आहेत?

    Ans: काही तक्रारींनुसार, फोनच्या स्क्रीनच्या मध्यभागी, म्हणजेच स्क्रीन फोल्ड होणाऱ्या हिंजजवळ समस्या दिसत आहे.

  • Que: Apple ने iPhone Duo च्या स्क्रीनच्या समस्येची दखल घेतली आहे का?

    Ans: दिलेल्या वृत्तानुसार, Apple ने काही डिव्हाइसमध्ये डिस्प्लेची समस्या असल्याचे मान्य केले आहे.

Web Title: Apple announces replacement for affected iphone duo devices after users report inner display crack hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा
1

मोबाईलची छोटी स्क्रीन विसरा! आता थेट Apple TV वर पाहता येणार Instagram रिल्स; मेटाने केली घोषणा

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स
2

Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस
3

Tech Tips: ऑनलाइन प्रायव्हसीची चिंता सोडा! Google Search मधून अशी हटवा वैयक्तिक माहिती, 90 टक्के लोकांना माहिती नाही ‘ही’ प्रोसेस

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत
4

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये iPad Mini (2026) ची एंट्री! OLED डिस्प्ले आणि A20 Pro चिपसेटने सुसज्ज… इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.