
Jio Cheapest Prepaid Plan: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आजकाल प्रत्येकाच्या खिशाला रिचार्जचा खर्च परवडत नाही. सगळे प्लॅन महाग झाले आहेत. महिन्याला 200-300 रुपये तर सहज जातात. पण तुम्हाला माहितीये का, जिओकडे एक असा प्लॅन आहे जो फक्त 123 रुपयात पूर्ण महिना चालतो? हो, अगदी खरं आहे. फक्त 123 रुपयात 28 दिवसांसाठी सगळं मिळतं. हा प्लॅन कोणासाठी आहे, यात काय काय मिळतं, चला जाणून घेऊया… Jio Cheapest Prepaid Plan:
या प्लॅनमध्ये कंपनी रोज GB मिळणार आहे. त्याचाअर्थ 0.5 GB. फार जास्त नाहीये परंतू WhatsApp, YouTube थोडंफार बघायला पुरतो. सोबतच कोणत्याही नंबरवर कितीही बोलू शकता. लोकल असो किंवा बाहेरगावचा नंबर असो, कॉलिंग पूर्ण फ्री आहे.आणि एसएमएस पण मिळतात. पूर्ण 28 दिवसात 300 मेसेज पाठवू शकता. रोजचा डेटा संपला तरी नेट बंद होत नसून स्पीड कमी होतो. 64 Kbps स्पीडने नेट चालू राहतं.
या प्लॅनमध्ये महिन्याभरासाठी 14 GB डेटा मिळेल. ज्यांना फक्त कॉलिंग जास्त करायचं असतं, त्यांच्यासाठी हा डेटा एकदम बेस्ट आहे.फ्री मध्ये अजून काय मिळतंय?जिओ फक्त डेटा-कॉलिंग देऊन थांबत नाही. JioSaavn, JioTV या दोन गोष्टी मोफत मिळतात. JioTV यावर तुम्ही लाईव्ह टीव्ही चॅनेल, सिरीयल, सिनेमा बघू शकता म्हणजे 123 रुपयात मनोरंजन पण फुल्ल मिळणार आहे. या प्लॅन सगळ्यांना मिळत नसून साधा स्मार्टफोन असेल.
हा रिचार्ज फक्त Jio Phone वाल्यांसाठी असल्याने स्मार्टफोनवालांसाठी नाहीये. कंपनीचा जो छोटा Keypad वाला 4G फोन येतो ना, त्याच्यासाठीच हा प्लॅन बनवला आहे. जर तुमच्या घरात Jio Phone कोणाकडे असेल 123 रुपयात रिचार्ज करू शकता.
जर तुम्हाला 123 रुपयाचा प्लॅन नको असेल, तर Jio Phone साठी दुसरे पण पर्याय आहेत. 234 किंवा 369 रुपयांचा तसेच एक मोठा 1234 रुपयाचा प्लॅन पण आहे.
Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या
सगळ्यांमध्ये इंटरनेट जवळपास सारखंच मिळतं. 123 रुपयात 28 दिवस टेन्शन नाही. कॉलिंग फ्री, थोडा डेटा, गाणी आणि टीव्ही पण फ्री.पण रिचार्ज करण्याच्या आधी एकदा चेक करा की तुमच्याकडे Jio Phone आहे का. घाईघाईत रिचार्ज करू नका. आधी फोन बघा, मगच रिचार्ज करा.
Ans: या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.
Ans: होय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन फक्त Jio Phone वापरकर्त्यांसाठी आहे. त्यामुळे स्मार्टफोनवर रिचार्ज करण्यापूर्वी पात्रता तपासावी.