BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग... किंमत केवळ इतकी
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली बीएसएनएल सतत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अनेक असे फायदे ऑफर केले जातात जे भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्या देत नाहीत. स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने एक अनोखा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 1 रुपयांत अनोखे फायदे ऑफर केले जात आहेत. म्हणजेच युजर्सना केवळ एक रुपयांत इंटरनेट डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या 1 रुपयांच्या प्लॅनमुळे भारतातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडाली आहे.
1 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनंनतर आता कंपनी आणखी एक रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 350 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 54 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्हाला अगदी कमी पैसे खर्च करून 54 दिवसांचा रिचार्ज प्लॅन वापरण्याची संधी मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे ऑफर केले जात आहेत, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसच नाही तर हाय स्पीड इंटरनेट डेटा देखील मिळणार आहे. बीएसएनएलच्या याच रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या नवीन रिचार्ज प्लॅनबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एक्सवर घोषणा केली आहे की, यूजर्सना फक्त 347 रुपयांमध्ये दररोज 2GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणाक आहे. यासोबतच, या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळेल, म्हणजेच तुम्ही दिवसरात्र तुम्हाला हवे तितके बोलू शकता. स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त फायदे पाहिजे असणाऱ्या युजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे.
तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
347 रुपयांच्या या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील दिले जातात. म्हणजेच, जर तुम्हाला मेसेज करायला आवडत असेल तर तुम्ही या प्लॅनसह ते काम सहजपणे करू शकता. या प्लॅनमध्ये अधिक डेटा उपलब्ध आहे आणि या प्लॅनची किंमत खूपच कमी आहे. त्यामुळे युजर्ससाठी हा प्लॅन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.
सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर दिली जात आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलकडे असा कोणताही प्लॅन नाही ज्यामध्ये तुम्हाला असे फायदे मिळतात. जिओ थोडी जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन ऑफर करतो, मात्र त्याची किंमत देखील जास्त आहे. जिओ 629 रुपयांत 56 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन ऑफर करतो, जिथे तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. तर एयरटेल 649 रुपयांच्या किंमतीत 54 दिवसांच्या व्हॅलिडीटीवाला प्लॅन ऑफर करतो. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमत अत्यंत कमी आहे.