Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत

भारती एअरटेलने त्यांच्या 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. 799 रुपयांचा प्लॅन आता 899 रुपयांना मिळणार असून, या बदलामुळे बजेट यूजर्सच्या खर्चात वाढ होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 20, 2026 | 12:59 PM
Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत

Follow Us
Follow Us:
  • भारती एअरटेलने 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 799 रुपयांवरून 899 रुपयांपर्यंत वाढवली आहे, म्हणजेच थेट 100 रुपयांची वाढ.
  • या किंमतवाढीमुळे बजेट यूजर्सवर मोठा परिणाम होणार असून, अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
  • नव्या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचे फायदे मिळणार आहेत.
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने अधिकृतपणे त्यांच्या 84 दिवसांच्या व्हॅलिडीटी असलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली आहे. त्यामुळे आतापर्यंत 799 रुपयांत उपलब्ध असणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने जाहिर केलेल्या या निर्णयावर यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. जे यूजर्स बजेट फ्रेंडली आणि कमी किंमतीत उपलब्ध असणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याला प्राधान्य देतात, अशा यूजर्सवर आता कंपनीच्या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये 799 रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 84 दिवसांची आहे. आता हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. आपला महसूल वाढवणे आणि नेटवर्कची गुणवत्ता टिकवून ठेवणे या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलच्या 799 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत आता 100 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ आता 3 महिन्यांची व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या रिचार्ज प्लॅनसाठी आता ग्राहकांना अतिरिक्त 100 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याचा परिणाम यूजर्सच्या खिशावर होणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने त्यांचा नफा वाढवण्यावर अधिक भर दे आहे. यामुळेच रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्यात आली आहे. 19 एप्रिल 2026 पासून हा बदल सर्वत्र लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्राहकान जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Tech Tips: Gaming Smartphone खरेदी करताय? हे फीचर्स नक्की तपासा, नाहीतर कराल पश्चाताप

899 रुपयांच्या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये आता यूजर्सना दररोज 1.5GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएसीची सुविधा देखील ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले एक्सेस देखील दिला जातो. संपूर्ण 84 दिवसांसाठी डेटा स्पीड स्थिर राहणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे जबरदस्त आहेत. यामध्ये कोणतीही शंका नाही. मात्र कंपनीने रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतल्याने यूजर्स नाराज झाले आहेत. यामुळे आता यूजर्स स्वस्त रिचार्ज प्लॅनकडे वळण्याची शक्यता आहे. रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवण्याच्या निर्णयाचा ग्रामीण भागातील यूजर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Airtel increased this recharge plan price users have to pay more money from now tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.