Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्‍नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर

Airtel ने एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ केबल लाँच केली आहे. २१,७०० आरकेएम सबमरीन केबल भारताला इजिप्‍तव्‍यतिरिक्‍त सिंगापूर व फ्रान्‍स (मार्सेली)शी कनेक्‍ट करेल, ज्‍यामुळे भारताची जगाशी कनेक्‍टीव्‍हीटी वाढेल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 19, 2025 | 02:19 PM
Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्‍नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर

Airtel ने गाठला यशाचा नवा टप्पा, मुंबई आणि चेन्‍नईत लाँच केली SEA-ME-WE 6 केबल; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

भारती एअरटेल लिमिटेडने एक नवा टप्पा गाठला आहे. मुंबई आणि चेन्‍नईत एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ केबल लाँच करण्यात आली आहे. भारती एअरटेल लिमिटेड या भारतातील आघाडीच्‍या टेलिकम्‍युनिकेशन्‍स सेवा प्रदाता कंपनीने मुंबई आणि चेन्‍नईमध्‍ये नवीन एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ (SEA-ME-WE 6) केबल लॉंच केली आहे. एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ म्हणजेच साऊथईस्‍ट एशिया-मिडल ईस्‍ट-वेस्‍ट युरोप-६ किंवा एमएमडब्‍ल्‍यू६ असं देखील म्हटलं जाऊ शकतं.

Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ

हे केबल लँडिंग सबकॉमने पूर्ण केले. लँडिंग सबकॉम हे एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ च्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि स्थापनेसाठी जबाबदार असलेल्या सबसी फायबर ऑप्टिक केबल डेटा सिस्टम्सची अग्रगण्य पुरवठादार आहे. २१,७०० आरकेएम लांबीची ही सबमरीन केबल सिस्टम भारताला स्थिर केबल्सद्वारे इजिप्‍त व्‍यतिरिक्‍त सिंगापूर आणि फ्रान्स (मार्सेली)ला कनेक्‍ट करते. यासह, एअरटेलने जागतिक स्तरावर सबमरीन केबल सिस्टममध्ये वैविध्यपूर्ण क्षमतेसह आपली नेटवर्क उपस्थिती आणखी वाढवली आहे.

एअरटेल बिझनेसचे संचालक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरत सिन्हा म्हणाले, ”एअरटेलमध्ये आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्‍न करतो आणि ही नवीन गुंतवणूक व महत्त्‍वपूर्ण टप्‍पा आमच्या सुरक्षित, वैविध्यपूर्ण व स्केलेबल जागतिक नेटवर्कमध्ये आणखी सुधारणा करेल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या सुविधांमध्ये सर्वात मोठ्या केबल सिस्‍टम्‍स आणून आमची जागतिक कनेक्‍टीव्हिटी आणखी प्रबळ करताना आम्हाला आनंद होत आहे. हे लॉंच ५० देशांमध्ये ४,००,००० आरकेएमच्या आमच्या विद्यमान नेटवर्क क्षमतेशी संलग्‍न आहे. यामधून अधिक मार्ग, विविधता आणि क्षमतेसह जागतिक कनेक्‍टीव्हिटी व डेटासाठी डिजिटल इंडियाच्या वाढत्या मागणीला पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मुंबई आणि चेन्नई येथे सुरू होणाऱ्या केबल एअरटेलच्या डेटा सेंटर शाखा,नेक्‍स्‍ट्रा बाय एअरटेसोबत पूर्णपणे एकत्रित केल्या जातील, ज्याचा उद्देश देशातील जागतिक हायपरस्केलर्स आणि व्यवसायांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि डेटा सेंटर सेवा प्रदान करणे आहे.

एअरटेल, एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-६ केबल सिस्टीम कन्सोर्टियमचा एक प्रमुख सदस्य आहे, त्याने कोर केबलमध्ये गुंतवणूक केली आहे आणि सिंगापूर, चेन्नई आणि मुंबई दरम्यान चार फायबर पेअर्सचे खाजगी नेटवर्क देखील सह-निर्मित केले आहे. ही केबल सिस्टीम 220 टीबीपी इतकी जागतिक क्षमता भारतात आणेल.

HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम

एअरटेलचे जागतिक नेटवर्क पाच खंडांमध्ये पसरलेले आहे. कंपनीने जागतिक स्तरावर ३४ केबल्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्यामध्ये अलिकडच्या काही केबल्समध्ये २ आफ्रिका, साऊथईस्‍ट एशिया-जपान केबल २ (एजेसी२) आणि इक्वियानो यांचा समावेश आहे. भारताला एपीएसी, युरोप, मध्य पूर्व आणि यूएस यांसारख्या प्रमुख प्रदेशांशी जोडणाऱ्या या केबल्स व्यतिरिक्‍त एअरटेलच्या जागतिक सबसी नेटवर्क गुंतवणुकीत आय२आय केबल नेटवर्क (आय२आयसीएन), युरोप इंडिया गेटवे (ईआयजी), आयएमईडब्‍ल्‍यूई, एसईए-एमई-डब्‍ल्‍यूई-४, एएजी, युनिटी, ईएएसएसवाय, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल (जीबीआय) आणि मिडल ईस्‍ट नॉर्थ आफ्रिका सबमरीन केबल (एमईएनए केबल) सारख्या मोठ्या केबल सिस्‍टम्‍सचा समावेश आहे.

Web Title: Airtel launch sea me we 6 cable in mumbai and chennai know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.