Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक जगभरात प्रसिद्ध आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे लोक एकमेकांशी सहज कनेक्ट होऊ शकतात. लोक फेसबुकवर त्यांच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी जोडले जातात. फेसबूक युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि प्लॅटफॉर्म वापरताना त्यांचा अनुभव अधिक मजेदार व्हावा, यासाठी मेटा नेहमीच वेगवेगळे फीचर्स आणि नियम जारी करत असते. आता देखील कंपनीने एक नवीन नियम जारी केला आहे, ज्याचा परिणाम युजर्सच्या लाईव्ह व्हिडीओवर होणार आहे.
मेटाच्या मालकीचे फेसबुक आज म्हणजेच 19 फेब्रुवारीपासून लाईव्ह स्ट्रीमिंगबाबतच्या नियमांमध्ये मोठा बदल करत आहे. कंपनी 30 दिवसांनंतर लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग हटवण्यास सुरुवात करेल. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी, वापरकर्त्यांना तो डाउनलोड करावा लागेल किंवा रील म्हणून शेअर करावा लागेल. कंपनी म्हणते की हा बदल केला जात आहे कारण बहुतेक लाईव्ह व्हिडिओ पहिल्या काही आठवड्यात पाहिले जातात. आणि नंतर त्यांचा वापर केला जात नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
फेसबुकने म्हटले आहे की 30 दिवसांपेक्षा जुने सर्व लाईव्ह व्हिडिओ टप्प्याटप्प्याने हटवले जातील. याआधी, युजर्सना ईमेल आणि अॅप नोटिफिकेशन्स पाठवल्या जातील, ज्यामध्ये त्यांना व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी कालावधी दिला जाईल. युजर्स त्यांचे व्हिडिओ थेट ड्रॉपबॉक्स किंवा गुगल ड्राइव्हवर ट्रान्सफर करू शकतील. फेसबुकने म्हटले आहे की हे नवीन नियम येत्या काही महिन्यांत जारी केले जाणार आहे, त्यानंतर सर्व जुने लाईव्ह व्हिडिओ काढून टाकले जातील. पण त्यापूर्वी युजर्सना ईमेल आणि अॅप नोटिफिकेशन्स पाठवल्या जातील.
फेसबुकने युजर्सना व्हिडिओ डाउनलोड करण्याचे अनेक मार्ग दिले आहेत. ते त्यांच्या अॅक्टिव्हिटी लॉग, प्रोफाइलवर जाऊन किंवा मेटा बिझनेस सूट वरून व्हिडिओ डाउनलोड करू शकतात. जर युजर्स लगेच डाउनलोड करू शकले नाहीत, तर फेसबुक नंतर युजर्सना व्हिडीओ डाउनलोड करण्याचा अतिरिक्त पर्याय देईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी अतिरिक्त 6 महिने मिळतील. पण यासाठी युजर्सना फेसबुकने पाठवलेल्या नोटिफिकेशनमधील ‘नो मोर’ वर टॅप करावे लागेल आणि ‘पोस्टपोन’ निवडावे लागेल. अन्यथा 30 दिवसांनंतर तुमचे व्हिडीओ काढून टाकले जातील.
जेव्हा अकाउंट हॅक होते तेव्हा गोपनीयतेचा धोका देखील वाढतो, अशा परिस्थितीत अकाउंट रिकव्हर करणे महत्वाचे आहे. हॅकर्स तुमचे फेसबुक अकाउंट हॅक करून तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फसवू शकतात. तसेच, बऱ्याच प्रकरणांमध्ये, त्यांचा हेतू तुमची वैयक्तिक माहिती चोरण्याचा असू शकतो.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे तर तुम्हाला सर्वात आधी फेसबुक मदत केंद्राची मदत घ्यावी लागेल. यानंतर, तुम्ही Forgotten Password पर्यायावर जाऊन तुमचे खाते रिकव्हर करू शकता. येथे तुम्हाला पुन्हा पासवर्ड टाकावा लागेल आणि पुन्हा लॉगिन करावे लागेल. याशिवाय, जर तुमचे फेसबुक अकाउंट हॅक झाले तर तुम्ही फेसबुकच्या अधिकृत पेजवर जाऊ शकता. तुम्हाला तिथे अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर तुमचे खाते रिकव्हर करण्याचे काम सुरू होईल.
HP Laptop: गेमिंगची मजा आता आणखी वाढणार! HP ने भारतात लाँच केला नवा लॅपटॉप, किंमत वाचून फुटेल घाम
फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर, जर तुमचा फोन नंबर आणि ईमेल आयडी दोन्ही बदलले असतील आणि तुम्ही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकत नसाल, तर तुम्ही facebook.com/login/identify वर जाऊ शकता. येथे तुम्हाला सुरक्षेशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, त्यानंतर एक तपशीलवार फॉर्म असेल. यासोबतच, तुम्हाला तुमचा आयडी म्हणून काही कागदपत्रे देखील द्यावी लागतील, जेणेकरून फेसबुकला खात्री पटेल की हे अकाउंट तुमचे आहे.