परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
कंपनीद्वारे सुरु करण्यात आलेली मोफत इंटरनॅशनल रोमिंग सुविधा एअरटेल पोस्टपेड प्लॅनमधील नवीनतम भर आहे. यामधील फास्ट लेन तंत्रज्ञान यूजर्सना उत्कृष्ट अनुभव, अनलिमिटेड डेटा, स्पॅम आणि फसव्या लिंक्सविरुद्ध नेटवर्क-स्तरीय संरक्षण ऑफर करते. ‘एअरटेल पोस्टपेड ॲडव्हांटेज क्लब’च्या माध्यमातून ग्राहक विविध प्रकारचे मनोरंजन सबस्क्रिप्शन्स आणि एक्सक्लुझिव्ह अनुभवांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये कॉमेडी शो, चित्रपट प्रीमियर आणि कॉन्सर्ट यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य: istock)
मोफत इंटरनॅशनल रोमिंग लाँचबाबत माहिती देताना भारती एअरटेलचे डायरेक्टर, मार्केट ऑपरेशन्स, अमित त्रिपाठी म्हणाले की, आमच्यासाठी पोस्टपेड सुविधा म्हणजेच ग्राहकांना भारतीय बाजारात सर्वोत्तम-इन-क्लास अनुभव ऑफर करणे. आम्ही देशातील सर्वोत्तम नेटवर्क अनुभव प्रदान करतो. यामध्ये आमच्या पोस्टपेड ग्राहकांना 5G वरील ‘फास्ट लेन’ तंत्रज्ञानाचा आणि स्पॅम व फसवणुकीपासून मिळणाऱ्या अखंड संरक्षणाचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त, ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात भर घालणारे मनोरंजन आणि सेवा उपलब्ध करून देऊन आम्ही त्यांना सर्वोत्तम मूल्य प्रदान करतो. यानंतर आता आम्ही आमच्या ग्राहकांसाठी मोफत इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा देखील सुरु करण्याच निर्णय घेतला आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सेवेचा दर्जा सतत सुधारण्यास आणि त्यांना ‘एअरटेल पोस्टपेड’ निवडण्यासाठी अधिकाधिक कारणे देण्यास कटिबद्ध आहोत.
इंटरनॅशनल रोमिंग प्लॅनची सुविधा 8 ऑक्टोबर 2026 पासून सुरु करण्यात आली आहे. इंटरनॅशनल रोमिंगची सुविधा एअरटेल पोस्टपेड निवडणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. विद्यमान एअरटेल ग्राहक (जुने पोस्टपेड प्लॅन किंवा प्रीपेडवर असलेले) एअरटेल ॲपद्वारे किंवा जवळच्या एअरटेल स्टोअरला भेट देऊन सहजपणे या प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात. जे एअरटेलचे ग्राहक नाहीत, ते एअरटेल ॲपद्वारे किंवा एअरटेल स्टोअरला भेट देऊन एअरटेल पोस्टपेड सेवेवर स्विच करण्याची विनंती करू शकतात.






