Tech Tips: 'या' कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग... ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
Smartphone Tips: स्मार्टफोन आपल्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनमुळे आपली अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण केली जाऊ शकतात. पण अनेकदा स्मार्टफोन अचानक गरम होऊ लागतो, यामुळे आपल्याला काय करावे सूचत नाही. बराच वेळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे डिव्हाईस गरम झाले असेल असे अनेकांना वाटतं. पण प्रत्येकवेळी स्मार्टफोन गरम झाल्यानंतर हे एकच कारण असेल असे नाही. जर तुमचा स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर त्यामागील कारणं जाणून घेणं, अत्यंत गरजेचं आहे.
सर्वात पहिले आणि सामान्य कारण म्हणजेच स्क्रीनची ब्राईटनेस सतत फुल असणं. जेव्हा आपण बराच वेळ ऊन्हात असतो, तेव्हा स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी ब्राईटनेस फुल करावी लागते. यामुळे डिस्प्ले पॅनल आणि प्रोसेसरवर लोड येतो. ज्यामुळे फोन अधिक वेगाने गरम होऊ लागतो. यामुळे तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, स्मार्टफोनची ऑटो-ब्राइटनेस सेटिंग चालू करा. यामुळे डिव्हाईस त्याच्या गरजेनुसार ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकतो, ज्यामुळे फोन जास्त गरम होत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
बॅकग्राऊंडमध्ये सुरु असणाऱ्या ॲप्समुळे देखील स्मार्टफोन जास्त गरम होऊ शकतो. बॅकग्राऊंड ॲप्स सतत डेटा आणि बॅटरी दोन्हीचा वापर करत असतात. यामुळे प्रोसेसर सतत काम करत राहतो, परिणामी स्मार्टफोन गरम होऊ लागतो. यावरील उपाय म्हणजेच सेटिंगमध्ये जाऊन बॅकग्राऊंड ॲप्स रिफ्रेश करा आणि बॅटरीचा वापर तपासा. ज्या ॲप्सचा सतत वापर केला जात नाही अशा ॲप्ससाठी बॅकग्राऊंड रनिंग त्वरित बंद करा.
स्मार्टफोनचे लोकेशन आणि जीपीएस सतत चालू ठेवल्याने देखील डिव्हाईस गरम होऊ शकते. नकाशा किंवा राईडिंग ॲप्स, विविध गेम्स आणि सोशल मीडिया ॲप्स देखील सतत तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन केवळ अशाच ॲप्सना लोकशन ॲक्सेस द्या, ज्यांची तुम्हाला खरंच गरज आहे. इतर ॲप्ससाठी लोकेशन ॲक्सेस बंद करा.
जेव्हा सर्व ॲप्सचे नोटिफिकेशन चालू असते प्रत्येक 5 मिनिटांनी फोनची स्क्रीन चालू होते. यामुळे फोन गरम होऊ लागतो. अशावेळी सेटिंगमध्ये जाऊन अशा ॲप्ससाठी नोटिफिकेशन बंद करा ज्यांचा सतत वापर केला जात नाही. यामुळे फोनचे तापमान कंट्रोल केले जाऊ शकते.
ऑटो-अपडेट्समुळे देखील फोन अनेकदा गरम होऊ शकतो. कारण फोनला वायफाय कनेक्ट होताच ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये आपोआप अपडेट होऊ लागतात. गूगल किंवा क्लाऊड सिंक देखील चालू होते. एकाच वेळी अनेक कामांचा लोड स्मार्टफोनवर येऊ शकतो. यामुळे सेटिंगमध्ये जाऊन ऑटो-अपडेट मॅन्युअलवर सेट करा आणि डेटा सिंक तुमच्या गरजेनुसार चालू ठेवा.






