
Airtel यूजर्सची चांदी! या प्लॅनमध्ये मिळणार 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् रोज 2GB डेटा... किंमत 1000 रुपयांहून कमी
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज
एअरटेलच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 979 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटा फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, यूजर्सना डेली 2GB डेटा मिळणार आहे. यासोबतच जर तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क उपलब्ध असेल तर तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. कॉलिंगसाठी या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
यासोबतच, या प्लॅनमध्ये डेली 100 एसएमएस मिळणार आहे. या प्लॅनचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यात ‘ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम’चे मोफत सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की, कंपनी ग्राहकांना 12 महिन्यांसाठी ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियमची किंमत सुमारे 4 हजार रुपये आहे.
इतकंच नाही तर, एअरटेल प्लॅनमध्ये एअरटेल सेफची सुविधा देखील मिळणार आहे. याद्वारे यूजर्सना स्पॅम कॉलचे रियल-टाइम अलर्ट, फ्रॉड लिंक ब्लॉकिंग आणि ओटीपीद्वारे होणाऱ्या बँकिंग फ्रॉडपासून सुरक्षा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये मोफत ‘हॅलोट्यून्स’ चा लाभ मिळतो. यूजर्स दर 30 दिवसांनी आपल्या नंबरवर स्वतःच्या पसंतीची ‘हॅलोट्यून’ सेट करू शकतात. तुम्ही जर असा एखादा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी मिळणार आहे. तसेच यामध्ये ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, एअरटेल सेफ आणि हॅलोट्यून्स सारखे फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत.
Ans: एअरटेलच्या ₹979 प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांची वैधता मिळते.
Ans: या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. पात्र क्षेत्रात अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळू शकतो.
Ans: होय. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसडीटी आणि रोमिंग कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळतात.