
WhatsApp च्या SIM-Binding नियमावर प्रश्नचिन्ह; परदेशात गेल्यावर मेसेजिंग सेवा बंद होणार का? व्यवसायांनाही फटका बसण्याची शक्यता
एक अनुभवजन्य मूल्यांकन’ (रिथिकिंग इंडियाज सिम-बाइंडिंग मन्डेट: ॲन इम्पिरिकल असेसमेंट) नावाचा हा अभ्यास, भारतातील १८ शहरांमधील २,०३३ ग्राहक आणि १७ शहरांमधील ३५३ व्यवसायांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये, दूरसंचार विभागाने (डीओटी) इंटरनेट-आधारित मेसेजिंग ॲप कंपन्यांना वापरकर्त्यांची खाती त्यांच्या नोंदणीकृत सिम कार्डशी जोडलेली ठेवण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीच्या निर्देशात दर सहा तासांनी वेब ॲप सेशन्स आपोआप बंद करण्याची तरतूद होती. नंतर जोखमीनुसार सेशन बंद करण्याची परवानगी देण्यासाठी यात सुधारणा करण्यात आली.
सर्वेक्षणानुसार, सिम-बाइंडिंग, म्हणजेच मेसेजिंग ॲप खात्याशी संबंधित सिम कार्ड संबंधित मोबाईल फोनमध्ये सक्रिय ठेवण्याची अट, लोकांसाठी, विशेषतः परदेश प्रवासादरम्यान समस्या निर्माण करू शकते. सर्वेक्षण केलेल्यांपैकी केवळ ३३ टक्के लोक भारतीय सिम कार्डवरील रोमिंग वैशिष्ट्यांचा वापर करतात. तर, ६७.१ टक्के लोक परदेशात स्थानिक सिम कार्ड, फक्त वाय-फाय किंवा दुसरे सिम कार्ड वापरतात. त्यामुळे, मोबाईल फोनमधून नोंदणीकृत भारतीय सिम कार्ड निर्षक्रय केल्यामुळे किंवा काढून टाकल्यामुळे मेसेजिंग सेवा काम करणे थांबल्यास, लोकांना अडचणी येऊ शकतात.
लूक प्रीमियम अन् फीचर्सही दमदार! Redmi चा नवा फोन पाहिलात का? लाँच होताच सुरु झाल्या चर्चा
सर्वेक्षण केलेल्यांपैकी ९७.७ टक्के लोकांनी सांगितले की, दुसऱ्या डिव्हाइसवर ॲप वापरत असताना त्यांना त्यातून आपोआप लॉग आउट करणे अवघड जाईल. त्याचप्रमाणे, ९७ टक्के लोकांनी सांगितले की, प्रवास करताना भारतीय सिम कार्डने वारंवार लॉग इन करणे अवघड जाईल. या अभ्यासात असे म्हटले आहे की, ‘सिम-बाइंडिंग’ नियमामुळे दुसऱ्या डिव्हाइसवर मेसेजिंग ॲप्सच्या वापरावर निर्बंध आल्यास, व्यावसायिक कामकाजावर परिणाम होऊ शकतो. सर्वेक्षण केलेल्यांपैकी जवळपास ७८ टक्के व्यवसायांनी मान्य केले की, अशा निर्बंधांमुळे त्यांच्या कामकाजावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम होईल.