Airtel ने केला खेळ! PhonePe, Paytm सारख्या अॅप्समधून गायब केला हा स्वस्त प्लॅन, आता रिचार्जसाठी इथं जावं लागेल
Airtel ही देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या युजर्सची संख्या देखील करोडोंच्या घरात आहे. कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच काही ना काही नवीन घेऊन येत असते. ज्यामुळे युजर्सना रिचार्ज प्लॅन्ससोबत अनेक बेनिफिट्स देखील मिळतात. कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी अगदी कमी पैशांतील रिचार्ज प्लॅन देखील सुरु केले आहेत. याशिवाय असे देखील अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, ज्यावर कंपनी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन ऑफर करते.
Google मध्ये झाला बदलं, ‘Logo’ मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय
Airtel युजर्स त्यांचा मंथली रिचार्ज करण्यासाठी सहसा फोनपे, पेटीएम किंवा एयरटेल थँक्स अॅपचा वापर करतात. लोकप्रिय यूपीआय अॅप फोनपे आणि पेटीएमवर कंपनीच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 199 रुपये होती. मात्र आता कंपनीने एक निर्णय घेतला असून फोनपे, पेटीएमवरून कंपनीचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन काढून टाकण्यात आला आहे. या प्लॅनची किंमत कमी होती आणि युजर्ससाठी यामध्ये महत्त्वाचे फायदे ऑफर केले जात होते. मात्र आता कंपनीना फोनपे, पेटीएमवरून हा रिचार्ज प्लॅन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन काढून टाकल्यानंतर आता फोनपे किंवा पेटीएम सारख्या यूपीआय अॅप्सवर एयरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 219 रुपये आहे. या प्लॅनमध्ये देखील 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनप्रमाणेच 28 दिवसांची व्हॅलिडीटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि संपूर्ण देशात कुठेही कॉल करण्याची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये 3GB डेटा ऑफर केला जातो, जो आधीच्या प्लॅनपेक्षा 1GB अधिका आहे.
जे लोक कंपनीच्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा वापर करत होते, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फोनपे किंवा पेटीएम सारख्या यूपीआय अॅप्सवर हा रिचार्ज प्लॅन काढून टाकण्यात आला असला तरी हा प्लॅन कायमचा बंद झालेला नाही. तुम्ही एयरटेल थँक्स अॅपवरून किंवा वेबसाईटवरून 199 रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकता.
Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन सेवा सुरु केली आहे. कंपनीने त्यांच्या 399 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (IPTV) सर्विस अॅड केली आहे. म्हणजेच युजर्सना हा प्लॅन खरेदी केल्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन सर्विसचा वापर करता येणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये कंपनी त्यांच्या युजर्सना आधीपासूनच ब्रॉडबँड (इंटरनेट) आणि डायरेक्ट-टू-होम (DTH) सर्विस ऑफर करत आहे. आता यामध्ये इंटरनेट प्रोटोकॉल टेलीविजन (IPTV) सर्विस देखील जोडण्यात आली आहे. 399 रुपयांच्या एयरटेल ब्लॅक प्लॅनमध्ये एक लँडलाइनसह अनलिमिटेड कॉल करण्याची सुविधा आणि एयरटेल ब्रॉडबँडच्या मदतीने 10Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड ऑफर केली जाते.