Google मध्ये झाला बदलं, 'Logo' मधील G आयकॉनचा बदलला लूक! 10 वर्षांनंतर कंपनीचा मोठा निर्णय
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील गुगलचा आयकॉन नोटीस केला का? टेक जायंट कंपनी आणि जगभरातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलचा लूक आता बदलला आहे. तब्बल 10 वर्षांनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आता गुगलचा लोगो बदलला आहे. गुगलच्या लोगोमधील सर्वात पहिलं आयकॉन G आता एका नवीन अवतारात युजर्सच्या भेटीला आलं आहे. कंपनीने रंगीत ‘G’ आयकॉन पुन्हा एकदा रिफ्रेश केलं आहे. हे आयकॉन तब्बल 10 वर्षांपूर्वी विज्युअल अपडेट करण्यात आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचे नवीन लोगो अपडेट Android आणि iOS दोन्हींसाठी उपलब्ध आहे. हा बदल अनेकांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दिसू लागला आहे. ज्यांना स्मार्टफोनमध्ये गुगलचा नवीन लोगो दिसत त्यांनी प्ले स्टोअरवरून अॅप अपडेट करणं गरजेचं आहे. हा बदलं अगदी छोटा आहे. मात्र हा बदल लोगोला अधिक आकर्षक बनवत आहे. गुगलचा नवीन लोगो आता आणखी रंगीत झाला आहे. कंपनीचा विश्वास आहे की, हा नवीन लोगो युजर्सना नक्की आवडेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने त्यांच्या लोगोमध्ये बदल केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. युजर्सना या नवीन लोगोबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना हा नवीन लोगो आवडला आहे तर अनेक युजर्सनी असं देखील म्हटलं आहे की, जुना लोगो अधिक चांगला होता.
Google has updated their logo pic.twitter.com/kaMeFry1NX
— Dexerto (@Dexerto) May 12, 2025
कंपनीने सुरुवातीला 1 सप्टेंबर 2015 रोजी ‘G’ आयकॉन रीडिजाइन केलं होतं, ज्यामध्ये गुगलने त्याचे सहा-अक्षरी वर्डमार्क प्रॉडक्ट सॅन्स नावाच्या आधुनिक, सॅन्स-सेरिफ टाइपफेसमध्ये अपडेट केले. पूर्वी ‘G’ आयकॉनमध्ये सॉलिड ब्लू बॅकग्राउंडच्या पार्श्वभूमीवर लोअरकेस पांढरा ‘g’ सेट केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार आणि एक्सवरील पोस्टनुसार, अपडेट केलेले आयकॉन गेल्या 10 वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या ‘G’ च्या स्पेसिफिक, सॉलिड कलर सेगमेंटपासून पूर्णपणे वेगळे आहे. त्याऐवजी, नवीन डिझाइनमध्ये लाल रंग पिवळ्या रंगात, पिवळा रंग हिरव्या रंगात आणि हिरवा रंग निळ्या रंगात वाहतो असे दिसते. म्हणजेच इथे रंगांमध्ये कोणताही खंड पाडण्यात आला नाही.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अपडेट केलेले ‘G’ आयकॉन सध्या iOS साठी Google Search अॅपमध्ये दृश्यमान आहे. हा बदल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरही गुगल अॅप व्हर्जन 16.18 च्या बीटा व्हर्जनसह आला आहे. तथापि, हा बदल अजूनही लागू केला जात आहे, म्हणजेच सध्या सर्वांना हा बदल दिसणार नाही. मात्र येत्या काही दिवसांतच सर्वांच्या फोनमध्ये हा बदल दिसण्याची शक्यता आहे.