Samsung Galaxy S25 Edge Launched: अल्ट्रा-थिन डिझाइन आणि आकर्षक लूक... सॅमसंगच्या नव्या Smartphone ची अखेर बाजारात एंट्री
स्मार्टफोन आणि टेक कंपनी Samsung ने त्यांचं बहुप्रतिक्षित डिव्हाईस अखेर लाँच केलं आहे. हे डिव्हाईस म्हणजे सॅमसंगचा सर्वात पातळ स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge आहे. Samsung Galaxy S25 Edge या स्मार्टफोनची डिझाईन इतकी आकर्षक आहे की अगदी पाहता क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडू शकतं. एवढंच नाही तर स्मार्टफोन आतापर्यंत सर्वात थिन स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन एका ईव्हेंटमध्ये सादर करण्यात आला होता, मात्र त्याची लाँच डेट जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र आता हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत.
Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोन कंपनीने प्री-रिकॉर्डेड यूट्यूब शेअर करत लाँच केला आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे स्मार्टफोनची जाडी केवळ 5.8mm आहे. हा स्मार्टफोनचा आतापर्यंतचा सर्वात पातळ गॅलेक्सी S सीरीज डिव्हाईस आहे. अल्ट्रा-थिन डिझाईनसह हा फोन कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील अगदी कमाल फीचर्स ऑफर करते. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy S25 Edge launched.
Price 💰 $1,099, €1,249Specifications
📱 6.7″ QHD+ Dynamic AMOLED 2X LTPO display, 120Hz refresh rate, Corning Gorilla glass ceramic 2 protection,
🔳 Qualcomm Snapdragon 8 Elite
LPDDR5x RAM & UFS 4.0 storage
🍭 Android 15 One UI 7
📸 200MP… pic.twitter.com/SzzcJb9ZWj— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 13, 2025
याशिवाय हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर आणि Android 15-बेस्ड One UI 7 ने सुसज्ज आहे. स्मार्टफोनच्या किंमतीचा विचार केला तर याची किंमत गॅलेक्सी S25+ आणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच स्मार्टफोनची किंमत प्रिमियम रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडणार आहे, यात काही शंकाच नाही.
Samsung Galaxy S25 Edge ची प्री ऑर्डर ग्लोबली आणि भारतात सुरु झाली आहे. या स्मार्टफोनची विक्री 23 मे पासून सुरु होणार आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल तर नवीन Samsung Galaxy S25 Edge $1,099.99 म्हणजेच सुमारे 94,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोनचा भारतातील लाँचिंग ईव्हेंट रद्द करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन युट्यूब व्हिडीओद्वारे लाँच करण्यात आला आहे. सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइटवर आज दुपारी 2 वाजल्यापासून या स्मार्टफोनची भारतातील प्री ऑर्डर सुरु करण्यात येणार आहे.
फोनमध्ये QHD+ रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600 निट्स पीक ब्राइटनेससह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 देण्यात आला आहे.
डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर गॅलेक्सी S25 सीरीजच्या इतर डिव्हाईसमध्ये देखील पाहायला मिळतो.
डिव्हाईसमध्ये 12GB LPDDR5x रॅम देण्यात आली आहे. ज्यामध्ये 256GB आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहेत.
कॅमेऱ्याच्या बाबतीत हे डिव्हाईस अगदी पावरफुल आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे.
डिव्हाईसमध्ये 25W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 3,900mAh बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की, डिव्हाईस 30 मिनिटांत 55 परसेंट पर्यंच चार्ज होतो.
फोनमध्ये आउट ऑफ दी बॉक्स वन यूआई 7 आणि गॅलेक्सी AI फीचर्स सारखे ड्रॉइंग असिस्ट आणि ऑडियो इरेजरसह अँड्रॉयड 15 देण्यात आलं आहे.
फोनमध्ये 5G, वाय-फाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिविटी, टायटॅनियम एलॉय फ्रेम देण्यात आली आहे. डिव्हाईसचे वजन 163 ग्रॅम आहे आणि हे IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंससह येते.