Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
जर तुमचे सिमकार्ड पिनचा वापर करून लॉक केले नसेल तर सायबर गुन्हेगार तुमचे सिम हॅक करण्यात यश मिळवू शकतात आणि तुमची सुरक्षा आणि प्रायव्हसी दोन्ही धोक्यात येऊ शकते. हॅकर्सनी जर तुमचे सिम हॅक केले तर तुमच्या नंबरवर येणारे ओटीपी आणि मेसेज हॅकर्सपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतात. यामुळे तुमच्या डिजीटल ओळखीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे UPI, बँक अकाउंट, ईमेल, सोशल मीडिया सर्वच धोक्यात येऊ शकतं. एवढंच नाही जर तुमचे सिम लॉक नेसल तर अगदी सहज तुमचा नंबर पोर्ट केला जाऊ शततो. तसेच डुप्लीकेट सिम देखील तयार केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही तुमच्या सिमवर पिन लॉक लावलं असेल तर कोणताही व्यक्ती योग्य पिन वापरल्याशिवाय सिमचा वापर करू शकणार नाही. यामुळे तुमचा नंबर देखील सुरक्षित राहील आणि यासंबंधिक अकाऊंटला देखील सुरक्षा मिळणार आहे. SIM लॉक करण्यापूर्वी तुमच्या मोबाइल ऑपरेटरकडून डिफॉल्ट सिम पिन जाणून घ्या. सहसा हा पिन 0000 किंवा 1234 असतो. मात्र प्रत्येक नेटवर्कवर हा पिन वेगळा असतो. जर तुम्ही योग्य माहितीशिवाय तुमचा पिन बदलला आणि नंतर तुम्ही हा पिन विसरलात तर तुम्हाला ओळखपत्रासह सर्विस सेंटरला जावे लागणार आहे.
अँड्रॉईड यूजर्स काही सोप्या स्टेप्स फॉलो करून त्यांचे सिम सुरक्षित ठेऊ शकतात. सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा. इथे तुम्हाला पासवर्ड आणि सिक्योरिटी किंवा प्रायव्हसी आणि सिक्योरिटी पर्याय दिसेल. हा पर्याय ओपन करताच तुम्हाला सिम लॉक किंवा लॉक सिम कार्ड ऑप्शन पाहायला मिळणार आहे. इथे तुम्ही सिम लॉक ऑन करू शकता. आता तुम्हाला पिन एंटर करण्याचा पर्याय मिळेल. आता तुम्हाला 4 अंकी पिन तयार करायचा आहे. असा पिन निवडा जो अगदी सहज तुमच्या लक्षात राहिल. सिम लॉक चालू केल्यानंतर फोन रीस्टार्ट करा. नेटवर्कशी कनेक्ट होण्यापूर्वी तुमचा फोन तुमचा सिम पिन विचारेल. तुम्ही तुमचा फोन रीस्टार्ट करता किंवा दुसऱ्या फोनमध्ये सिम कार्ड घालता तेव्हा ही प्रक्रिया प्रत्येक वेळी पुनरावृत्ती होईल.






