Flipkart - Amazon Sale 2025: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! बजेटपासून प्रिमियमपर्यंत.. तब्बल इतक्या कमी झाल्या स्मार्टफोनच्या किंमती
Amazon आणि Flipkart सेल आज 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेट किंमतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. Amazon आणि Flipkart सेलमध्ये आकर्षक किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्मार्टफोन्सवरील या डिल्सबाबत जाणून घेऊया.
GST tax Change: AC, फ्रीज आणि TV सह हे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स झाले स्वस्त, वाचा संपूर्ण यादी
गेल्यावर्षी 80 हजार रुपयांच्या किंमतीत iPhone 16 लाँच करण्यात आला होता. मात्र आता या आयफोनवर फ्लिपकार्ट सेलमध्ये बंपर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 16 51,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. बँक ऑफर्ससह हा फोन 50,000 हून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगचा फ्लॅगशिप डिवाइस Samsung Galaxy S24 Ultra कंपनीच्या वेबसाईटवर 98,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. मात्र अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 71,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
वनप्लसच्या या प्रिमियम स्मार्टफोनवर अॅमेझॉन मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहे. सेलमध्ये हा फोन 61,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 4000 रुपयांहून अधिकचे बँक डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे.
iQOO 13 च्या खरेदीवर देखील सेलदरम्यान मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. 55 हजार रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता 50,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
जर तुम्ही तुमच्या बजेट किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Oppo K13 एक चांगली संधी आहे. हा फोन 17,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या फोनवर फ्लिपकार्टवर 3,000 रुपयांचे बँक डिस्काउंट देखील दिले जात आहे. अशा प्रकारे हा फोन 15 हजार रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
अॅमेझॉनवर OnePlus Nord CE5 ची किंमत 24,999 रुपये आहे. मात्र काही बँक ऑफर्ससह या डिव्हाईसची किंमत कमी झाली आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनसह या फोनवर 2000 रुपयांचे डिस्काऊंट दिलं जात आहे. त्यामुळे हा फोन 22,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे जुने सॅमसंग डिव्हाइस असेल, तर तुम्हाला त्याच्या एक्सचेंजवर 3000 ते 5000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
हा प्रिमियम स्मार्टफोन भारतात 1,64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ 1,10,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर 54,000 रुपयांचे बचत करण्याची संधी मिळणार आहे.
Amazon च्या फेस्टिवल सेलमध्ये iPhone 15 45,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची लाँच किंमत 79,900 रुपये आहे.
Samsung Galaxy S23 Ultra भारतात 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये या फोनची किंमत 78,000 रुपये झाली आहे. त्यामुळे फोनच्या खरेदीवर 41,900 रुपयांची बचत होणार आहे. ग्राहकांना Amazon Pay ICICI बँक कार्ड वापरल्यास त्यांना 2,340 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल.