Amazon Great Indian Festival 2025: केवळ इतक्या किंमतीत तुमच्या मालकीचा होईल Samsung चा 'हा' फोल्डेबल फोन, असे आहे स्मार्ट Features
Samsung Galaxy Z Fold 6: Amazon ने ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 ची घोषणा केली आहे. हा सेल सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. प्राईम मेंबर्ससाठी 22 सप्टेंबरपासून आणि इतर ग्राहकांसाठी 23 सप्टेंबरपासून हा सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट्स उपलब्ध असणार आहे. इतर वस्तूंपेक्षा सर्वात जास्त लक्ष सेलमधील स्मार्टफोनच्या किंमतीवर आहे.
यावेळी सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांचे ड्रिम स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. या सेलमधील सर्वात मोठे हायलाईट म्हणजे Samsung Galaxy Z Fold 6. Samsung Galaxy Z Fold 6 वरील डिस्काऊंट पाहून अनेकांना विश्वास बसत नाही. Samsung Galaxy Z Fold 6 ची किंमत सेलमध्ये तब्बल 54 हजार रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता सर्व स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष Samsung Galaxy Z Fold 6 कडे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये Samsung Galaxy Z Fold 6 वर आतापर्यंतचं सर्वात मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ज्यांना फोल्डेबल फोन खरेदी करण्याची इच्छा असेल ते लोकं नक्कीच या डिलचा फायदा घेऊ शकतात. ही डिल अशा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे गेल्या अनेक महिन्यांपासून Samsung Galaxy Z Fold 6 खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण किंमत जास्त असल्यामुळे त्यांना हा फोन खरेदी करणं शक्य झालं नाही. मात्र आता असं होणार नाही. कारण Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये या फोनची किंमत 54,000 रुपयांनी कमी झाली आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 भारतात 1,64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2025 मध्ये याची किंमत 54,000 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन केवळ 1,10,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये 7.6 इंचाचा इनर डिस्प्ले आणि 6.3 इंचाची आउटर स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही स्क्रिन Dynamic AMOLED 2X पॅनल आहेत आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश
फोल्डेबल स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये कंपनीने ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिली आहे. यामध्ये OIS सपोर्टसह 50MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 10MP का टेलीफोटो शूटर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोल्डेबल फोनमध्ये 10MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4400mAh ची डुअल बॅटरी आहे, जी 25W चार्जिंग सपोर्ट आहे.