Redmi Note 17 5G ची भारतात तुफानी एंट्री; मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने वेधले लक्ष, किंमत तुमच्या बजेटमध्ये
रेडमीने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आहे. हे डिव्हाईस आर्कटिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाइट या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन आर्कटिक ब्लू, स्टारलाइट पर्पल आणि डार्क नाइट या रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. स्मार्टफोनची विक्री 12 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन शाओमीचे ई-स्टोअर, किरकोळ विक्री केंद्रे आणि ॲमेझॉनवरून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Redmi)
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, फोनमध्ये 7-इंच ट्रूकलर ॲमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्सची पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. तुम्ही ओल्या हातांनी फोनचा वापर करू शकता. यासाठी फोनमध्ये हायड्रो-टच 2.0 मिळणार आहे. डिव्हाईस कमी ब्लू लाइट व पीडब्ल्यूएम डिमिंगसाठी TÜV Rheinland सर्टिफिकेशन ऑफर करते.
फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 4 जेन 4 चिपसेट मिळणार आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम देखील मिळणार आहे. सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये हायपरओएस 3 सह अँड्रॉईड 16 देखील मिळणार आहे. तसेच, शाओमीने 4 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि सहा वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच अपडेट करण्याचे वचन दिले आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा एआय कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 2x इन-सेंसर जूम, नाइट मोड आणि एआय-बेस्ड एचडीआर आणि सीन डिटेक्शनची सुविधा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार
कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8,000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.






