Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?
तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि एखाद्या कंपनीने तुम्हाला 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 87,24,50,00,000 रुपयांचे पॅकेज ऑफर केले तर तुम्ही नाकारू शकता का? कदाचित नाही. जगात असा क्वचितच असा एखादा व्यक्ती असू शकतो जो 1.5 अब्ज डॉलर्सचे पॅकेज नाकारू शकतो. हा व्यक्ती अँड्रयू टुलक आहे. अँड्रयू टुलकने मार्क झुकरबर्गने ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली आहे. त्याने दिलेल्या या नकारामुळे आता सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला आहे. असं कोणी 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारू शकते, असा एकच प्रश्न आता सोशल मीडिया युजर्सच्या मनात आहे. पण अद्याप अनेकांना माहिती नाही की अँड्रयू टुलक नक्की आहे कोण आणि त्याने ही ऑफर का नाकारली, याबाबत आता जाणून घेऊया.
अँड्रयू टुलक एक ऑस्ट्रेलियन कंप्यूटर साइंटिस्ट आहे. अँड्रयूचा आतापर्यंतचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. त्याने गोल्डमॅन सॅक्समध्ये कामं केलं आहे. कॅम्ब्रिज यूनिवर्सिटीमधून मॅथेमॅटिकल स्टेटिक्समध्ये डिग्री पूर्ण केली आणि त्यानंतर Facebook (आता Meta) आणि OpenAI सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम देखील केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Meta चे CEO मार्क झुकरबर्ग यांनी टुलकला त्यांच्या नवीन AI सुपरइंटेलिजेंस टीममध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती. यासाठी टुलकला 6 वर्षांचा बोनस आणि स्टॉकसह सुमारे 1.5 अब्ज डॉलर्सची ऑफर देण्यात आली. मात्र अँड्रयू टुलकने मेटाची ही ऑफर नाकारली. त्याच्या या नकाराने सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला. त्याच्या या नकाराचं कारण म्हणजे अँड्रयू टुलकला स्वत:ची कंपनी सुरु करायची आहे. Thinking Machines Lab एक नवीन AI स्टार्टअप आहे. जे मीरा मुराटी आणि टुलक यांनी एकत्रित तयार केले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानंतर, लोक अँड्रयू टुलकच्या निर्णयाने आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी अँड्रयू टुलकचे प्रोफाईल शोधण्यास सुरुवात केली होती. आता लाखो लोक त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर त्याच्या कारकिर्दीच्या प्रवासातून प्रेरणा घेत आहेत. अँड्रयू टुलकच्या नकाराने लोकं आश्चर्यचकित झाले आहेत कारण त्याने पैशाऐवजी दृष्टी आणि स्वातंत्र्य निवडले. सध्याच्या काळात जगातील सर्वात मोठ्या व्यक्ती देखील अब्जावधी किमतीच्या ऑफरला नाही म्हणू शकत नाहीत, अशा परिस्थितीत अँड्रयू टुलकने या ऑफरला नकार दिला आहे.
कोण आहे अँड्रयू टुलक?
तो एक संगणक शास्त्रज्ञ आहे ज्याने मेटा आणि ओपनएआय मध्ये काम केले आहे
Meta ने अँड्रयू टुलकला किती रुपयांची ऑफर दिली होती?
1.5 अब्ज डॉलर्स
Meta चे CEO कोण आहेत?
मार्क झुकरबर्ग