27 वर्षांच्या यूट्यूबरने केली कमाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलं हे स्पेशल प्ले बटन! सब्सक्राइबर्सचा आकडा वाचून उडतील तुमचे होश
YouTube हे व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे. जगभरात YouTube चा वापर केला जातो. YouTube वर लाखो चॅनेल्स आहेत आणि जगभरात करोडो युट्यूबर्स आहेत. याच YouTube च्या जगातील सर्वात मोठ्या क्रिएटर्सपैकी एक असलेला Jimmy Donaldson, ज्याला संपूर्ण जग MrBeast या नावाने ओळखते. खरं तर MrBeast हा जगभरातील तरूण युट्यूबर्सपैकी एक आहे. याच जगभरात लोकप्रिय असलेल्या MrBeast ने 1 जून 2025 रोजी एक इतिहास रचला होता. MrBeast ने त्याच्या युट्यूब चॅनेलवर तब्बल 400 मिलियन सब्सक्राइबर्सचा आकडा पार केला. या इतिहासानंतर MrBeast ने T-Series ला देखील मागे टाकलं आहे. T-Series चे 299 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.
हा अनोखा इतिहास रचल्यानंतर MrBeast ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “400 मिलियन सब्सक्राइबर्स! जेव्हा मी दशकभरापूर्वी सुरुवात केली तेव्हा लोक म्हणायचे की मी खूप वेडा आहे आणि कधीही यशस्वी होणार नाही. मात्र त्यावेळी मी कोणाचंही ऐकलं नाही आणि मी 7 वर्षांपर्यंत प्रचंड मेहनत केली. कारण कंटेट तयार करणं माझ्यासाठी सर्वकाही होतं. मी माझ्या आईला सांगितले होते की मी बेघर राहीन पण दुसरे काहीही करणार नाही. YouTube आणि तुम्हा सर्वांचे आभार, मला दररोज जगण्याचा एक उद्देश सापडला आहे.” (फोटो सौजन्य – Pinterest)
MrBeast ला अलीकडेच युट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी एक खास 400 मिलियन सब्सक्राइबर प्ले बटन दिलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, “400M सब्सक्राइबर्स प्ले बटन! थँक यू युट्यूब.” हे अवॉर्ड विशेष करून MrBeast साठी तयार करण्यात आलं आहे कारण तो YouTube च्या इतिहासातील पहिला व्यक्ती आहे ज्याने 400M सब्सक्राइबरचा आकडा पार केला आहे. ही ट्रॉफी पॉलिश केलेल्या धातूपासून बनलेली आहे आणि त्याच्या मध्यभागी एक निळा मौल्यवान दगड जडवलेला आहे.
MrBeast ने त्याच्या या यशाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. एक यूजरने लिहीले की, “YouTube ला आता एक नवीन डिझाईन घेऊन येण्याची गरज आहे.” Reddit वर देखील याबाबत चर्चा सुरु झाली. तिथे एक पोस्ट मध्ये म्हटलं की, असे दिसते की ही ट्रॉफी फक्त औपचारिकतेसाठी बनवली गेली आहे.” एकाने म्हटले, “ही तीच 10 मिलियन वाली ट्रॉफी आहे, फक्त मध्यभागी निळा रंग भरलेला आहे.” कोणीतरी म्हटले, “हे एआय जनरेटेड प्ले बटणासारखे दिसते.” दुसरा म्हणाला, “पूर्वी सोनेरी बटणावर प्रत्यक्षात सोनेरी लोगो होता, आता तो फक्त रंगीत झाला आहे.”
MrBeast चं खरं नाव काय आहे?
जिमी डोनाल्डसन
जिमी डोनाल्डसन च्या युट्यूब चॅनेलचं नाव काय आहे?
MrBeast
T-Series चे युट्यूबवर किती सब्सक्राइबर्स आहेत?
299 मिलियन