10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज... जाणून घ्या किंमत
विवो वाय 600 एस प्रो च्या 8GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आहे. तर 8GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 43,300 रुपये आहे. हा स्मार्टफोन मूनलाइट ब्लॅक, फ्लोटिंग गोल्ड, स्टारी पर्पल आणि वास्ट ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: X)
विवो वाय 600 एस प्रो अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 वर चालतो आणि हा स्मार्टफोन डुअल नॅनो-सिम कार्ड्ससह 5G कनेक्टिविटीला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K (2,800×1,260 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, एचडीआर आणि P3 वाइड कलर गॅमटला सपोर्ट करतो.
परफॉर्मंससाठी विवो वाय 600 एस प्रो मध्ये 6nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e चिपसेट मिळणार आहे. ज्याला 8GB एलपीडीडीआर5 रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 3.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. मेमोरी फ्यूजन फीचरद्वारे या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत अतिरिक्त वर्चुअल रॅम सपोर्ट देखील मिळणार आहे.
विवो वाय 600 एस प्रोमध्ये f/1.8 अपर्चर वाला 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि f/2.45 अपर्चर वाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनचे दोन्ही कॅमेरे इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबलाइजेशन (EIS) आणि 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.
कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये वायफाय 6, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, बेईडौ, ग्लोनास, गॅलिलिओ, QZSS, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यांचा समावेश आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये स्टीरियो स्पीकर्स, इन्फ्रारेड (IR) रिमोट कंट्रोल, फेस रिकग्निशन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखे इतर फीचर्स देखील मिळणार आहेत.
विवो वाय 600 एस प्रोमध्ये 90W वायर्ड चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 10,200mAh बॅटरी दिली आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देखील दिला आहे.






