
10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स
स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, विवो एस2 एफई 6GB + 128GB आणि 8GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांत उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 42,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन स्टेलर ग्रीन, टायटन ब्लॅक आणि झेन व्हाइट या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – Vivo)
स्मार्टफोनच्या ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर, लाँच ऑफरअंतर्गत, डिव्हाईसच्या खरेदीवर 10 टक्के इंस्टंट कॅशबॅक किंवा 10 टक्के एक्सचेंज बोनस ऑफर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, 100GB गुगल वन स्टोरेज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिले जात आहे. तसेच, फोनसाठी ‘व्ही-शील्ड’ स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शनवर 40 टक्क्यांपर्यंत सवलतही उपलब्ध आहे.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.83 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि एचबीएममध्ये 2,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e 5G चिपसेट मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
डिव्हाईसमध्ये 44W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बॅटरी 68 तासांपर्यंतचा कॉलिंग वेळ आणि 30 तासांपर्यंतचा टिकटॉक व्हिडिओ प्लेबॅक वेळ देऊ शकते.
अधिक चांगल्या हिट मॅनेजमेंटसाठी फोनमध्ये 3,800 वर्ग मिलीमीटरचे वेपर चेंबर कूलिंग सिस्टिम देखील मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, वायफाय, ब्लूटूथ 5.4 आणि यूएसबी टाइप-सी सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.
बजेट कमी, पण फीचर्स दमदार! Samsung चा नवा 5G स्मार्टफोन भारतात दाखल; किंमत 20 हजार रुपयांहून कमी
नव्या स्मार्टफोनमध्ये 50MP चा सोनी IMX852 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 2MP चा Bokeh सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे.
Ans: विवो एस2 एफई स्मार्टफोनची भारतात विक्री 20 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे.
Ans: विवो एस2 एफई स्मार्टफोनमध्ये 10,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
Ans: हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, विवो इंडिया च्या अधिकृत वेबसाइटवर आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये खरेदी करता येईल.