Motorola Signature vs OnePlus 15: डिस्प्ले, कॅमेरा, परफॉर्मंसमध्ये कोणी मारली बाजी? कोणता प्रिमियम स्मार्टफोन ठरणार बेस्ट?
Motorola Signature मध्ये 6.8-इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 165Hz रिफ्रेश रेट आणि 6200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे, ज्यामुळे कडक ऊन्हात देखील डिस्प्ले स्पष्टपणे पाहू शकता. डॉल्बी व्हिजन सपोर्टमुळे व्हिडीओ पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. OnePlus 15 मध्ये 6.78-इंच अलमाँड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 165Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि HDR Vivid सपोर्ट दिला आहे. याची पीक ब्राइटनेस 1800 निट्सपर्यंत मर्यादित आहे. ब्राईटनेसच्या बाबतीत मोटोरोलाने बाजी मारली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Motorola Signature मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर, जो 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हे कॉम्बिनेशन अतिशय पावरफुल मानले जाते. तर, दुसरीकडे OnePlus 15 मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट, 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे. रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत Motorola जास्त ऑप्शन्स ऑफर करतो.
बॅटरी सेगमेंटमध्ये OnePlus 15 ने बाजी मारल आहे. या स्मार्टफोनमध्ये 7300mAh बॅटरीसह 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तर Motorola Signature मध्ये 5200mAh बॅटरीसह 90W वायर्ड चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Motorola Signature मध्ये ट्रिपल 50MP रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 100x पेरिस्कोप जूम आणि अल्ट्रा-वाइड लेंस समाविष्ट आहे. याशिवाय, डिव्हाईसमध्ये सेल्फी लवर्ससाठी 50MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. OnePlus 15 देखील ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप ऑफर करतो. ज्यामध्ये Sony प्राइमरी सेंसर, 3x ऑप्टिकल जूम + 100x सुपर जूम टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिव्हाईसमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे.
चार्जिंग करताना फोन फुटला! Samsung Galaxy S25+ प्रकरणाने सोशल मीडियावर खळबळ, कंपनीने दिलं स्पष्टीकरण
Motorola Signature स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित Hello UI वर चालतो आणि कंपनीने वचन दिले आहे की, स्मार्टफोनला 7 वर्षांसाठी OS आणि सिक्योरिटी अपडेट्स दिले जाणार आहे. OnePlus 15 मध्ये OxygenOS 16 (अँड्रॉईड 16 वर आधारित) आहे, 4 साल अँड्रॉइड अपडेट आणि 6 साल सिक्योरिटी अपडेट विकसित केले आहे.
Motorola Signature वॅल्यू-फॉर-मनी आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,999 रुपये आहे. तर OnePlus 15 च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.






