Apple ने जारी केले iOS 26 चे Beta 6 अपडेट, पूर्वीपेक्षा अधिक उत्तम झाला नेविगेशन बार! आणखी काय बदललं? जाणून घ्या
iPhone युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. टेक जायंट कंपनी अॅपलने iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेट जारी केले आहे. एवढंच नाही तर कंपनीने iPadOS, watchOS, tvOS, macOS साठी देखील अपडेट्स जारी केले आहेत. त्यामुळे आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी सप्टेंबरपर्यंत या बीटा अपडेटचे स्टेबल अपडेट रिलीज करू शकते. कारण नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या लेटेस्ट अपडेटमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही.
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
अॅपलने iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेटमध्ये काही छोटे बदल केले आहेत आणि नवीन फीचर्स जोडले आहेत. ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. हे अपडेट जरी छोट्या बदलांसह रिलीज करण्यात आले असले तरी देखील आयफोन युजर्ससाठी हे लेटेस्ट अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे. या नव्या अपडेटचा उद्देश सिस्टम फास्ट, स्मूथ आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगली बनवणं असा आहे. कंपनीने iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेटमध्ये कोणते बदल केले आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने या नवीन अपडेटमध्ये आधीपासूनच काही नव्या रिंगटोन्स जोडल्या आहेत. ज्यामध्ये Buoyant, Dreamer, Tech, Pop, Reflected आणि Surge यांचा समावेश आहे. यासोबतच एक Little Bird नावाची रिंगटोन देखील जोडण्यात आली आहे. यासोबतच टॉगल्सवर क्लिक केल्यानंतर खास लिक्विड ग्लास इफेक्ट पाहायला मिळतात.
अॅपलने रिलीज केलेल्या नव्या iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेटनंतर आता लॉक स्क्रीनवर लिक्विड ग्लास इफेक्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे युजर्सना नवीन अनुभव मिळणार आहे. लॉक स्क्रीनवरील घड्याळ आता अधिक ट्रांसपेरेंट आहे, परंतु तरीही त्याची फ्रोस्टेड ग्लास स्टाइल कायम ठेवते. याशिवाय, पासकोड बटण देखील पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक बनवण्यात आले आहे. त्यामुळे नव्या अपडेटमध्ये कमी पण महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेटनंतर अॅप्समधील नेविगेशन बार आता पूर्वीपेक्षा अधिक चांगला बनवण्यात आला आहे, ज्यामुळे ट्रांसपेरेंसी सुधारली जाणार आहे आणि मजकूर वाचण्यात युजर्सना कोणतीही समस्या येणार नाही. काही ठिकाणी ट्रांसपेरेंसी वाढण्यात आली आहे, तर काही ठिकाणी बॅकग्राउंड अधिक ट्रांसपेरेंट बनवण्यात आलं आहे. अॅप्स उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी अॅनिमेशन आता बरेच जलद आहेत, त्यात थोडासा बाउन्स इफेक्ट जोडला गेला आहे जो लॉक स्क्रीन आणि कंट्रोल सेंटरवरील अपडेट केलेल्या अॅनिमेशनसारखा दिसतो.
Apple iOS 26 बीटा 6 मध्ये कोणत्या नवीन रिंगटोन जोडल्या आहेत?
Buoyant, Dreamer, Tech, Pop, Reflected आणि Surge
iOS 26 चे 6th डेवलपर बीटा अपडेटचे स्टेबल वर्जन कधी रिलीज केलं जाणार?
सप्टेंबर