Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

Apple iOS 27 Update: अ‍ॅपलने अखेर नवीन आयओएस अपडेट ईव्हेंटमध्ये सादर केले आहे. तसेच कंपनीने यादी देखील जाहीर केली आहे की, कोणत्या आयफोन मॉडेल्सना कंपनीचे नवीन अपडेट मिळणार. या नव्या अपडेटमुळे आयफोन यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. नव्या अपडेटमध्ये काय खास आहे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 10:06 AM
Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

Apple WWDC 2026: टेक कंपनीने सादर केला नवा iOS 27! तुमच्या iPhone ला मिळणार का लेटेस्ट अपडेट? वाचा यादी

Follow Us
Follow Us:
  • iOS 27 मध्ये अ‍ॅप्स 30 टक्के आणि फोटो लायब्ररी 70 टक्के अधिक वेगाने लोड होणार असल्याचा दावा अ‍ॅपलने केला आहे.
  • नवीन अपडेटमध्ये गुगल जेमिनी आणि अ‍ॅपलच्या फाउंडेशन मॉडेलवर आधारित प्रगत सिरी एआय असिस्टंट सादर करण्यात आला आहे.
  • iPhone 11 आणि त्यानंतरच्या सर्व आयफोन मॉडेल्सना iOS 27 अपडेटचा सपोर्ट मिळणार आहे.
Apple Event 2026: टेक जायंट कंपनी अ‍ॅपलने आयोजित केलेल्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2026 ईव्हेंटला सुरुवात झाली आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनीने लेटेस्ट iOS 27 सादर केले आहे. लेटेस्ट iOS 27 हे कंपनीच्या आयफोनसाठी सादर करण्यात आलेले लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट आहे. या नव्या अपडेटबाबत कंपनीचं असं म्हणणं आहे की, आता आयफोनमधील अ‍ॅप्स 30 टक्के वेगाने उघडणार आहेत. तसेच फोटो क्लिक केल्यानंतर लायब्ररी 70 टक्के वेगाने उघडणार आहे.

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

iOS 27 चे मुख्य फीचर्स

iOS 27 मध्ये कंपनीने लिक्विड ग्लास डिझाईनमध्ये सुधारणा केली आहे. यासोबतच परफॉर्मंस देखील बूस्ट केला आहे. आयओएस 26 च्या तुलनेत फोटो 70 टक्के आणि अ‍ॅप्स 30 टक्के वेगाने लोड होणार आहेत. तसेच एयरड्रॉपने फाईल्स शेअर करण्याचे काम देखील 80 टक्के वेगाने पूर्ण केले जाणार आहे. तसेच, वायाफाय आणि सेल्युलर नेटवर्क स्विच करणं देखील अधिक सोपं होणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, परफॉर्मंस अधिक सुधारण्यासाठी CPU शेड्यूल दिले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

 

These are the devices compatible with iOS 27 🚨 pic.twitter.com/5P06YlP1BU — Apple Hub (@theapplehub) June 8, 2026

सिरी एआय असिस्टंट

आयफोनच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिममध्ये कंपनीने अनेक एआय फीचर्स देखील जोडले आहेत. यामधील सर्वात खास फीचर आहे, सिरी एआय असिस्टंट. सिरी एआय असिस्टंट अ‍ॅपलच्या फाउंडेशन मॉडेल आणि गूगलच्या जेमिनी एआय मॉडेलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आले आहे. कंपनीने सिरीचे एक वेगळे अ‍ॅप देखील लाँच केले आहे. ज्यामध्ये सिरीसोबत केलेले संभाषण पुन्हा पाहू शकता.

अ‍ॅपल इंटेलिजेंस

कंपनीने अ‍ॅपल इंटेलिजेंससाठी देखील काही महत्त्वपूर्ण अपडेट्स जारी केले आहेत. आता सफारी, वॉलेट, फोटो आणि दूसऱ्या अ‍ॅप्समध्ये देखील आयओएस 27 सह अ‍ॅपल इंटेलिजेंस सपोर्ट देखील मिळणार आहे. यासोबतच एआयच्या मदतीने फोटो एडीट करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. यूजर्स फोटोमधील ऑब्जेक्ट रिफ्रेम करू शकणार आहेत.

विजुअल इंटेलिजेंस फीचर

कॅमेऱ्यावर लाँग प्रेस केल्यास यूजर्स अ‍ॅपलचे विजुअल इंटेलिजेंस फीचर वापरू शकणार आहेत. हे फीचर आयफोन 15 प्रो सिरीजपासून उपलब्ध असणार आहे. तसेच यूजर्सना सिरीचा आवाज कस्टमाइज करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे. आयओएस 27 मध्ये, यूजर्स फोन ॲप आणि मेल ॲपमधून महत्त्वाची माहिती शोधू शकतील. सफारी ॲपमधील टेबल्सचे विषयानुसार गट तयार केले जातील. अ‍ॅपलने नव्या सॉफ्टवेअरसह पॅरेंटल कंट्रोल फीचर देखील जोडले आहे, ज्यामध्ये टाइम अलाउंट आणि शेड्यूल सारख्या गोष्टींचा समावेश आहे. हे फीचर्स iOS 27, iPadOS 27, आणि macOS 27 मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत.

The new Siri AI in iOS 27 is incredible 🔥 pic.twitter.com/EPEfUdpwf2 — Apple Hub (@theapplehub) June 9, 2026

iOS 27 कधी होणार रिलीज?

WWDC कीनोट ईव्हेंटमध्ये कंपनीने सांगितलं आहे की, डेव्हलपर्ससाठी अपडेट उपलब्ध झाले आहे. इतर यूजर्ससाठी नवीन सॉफ्टवेअर सप्टेंबरमध्ये लेटेस्ट आयफोन सीरीजसह रिलीज केले जाऊ शकते. तसेच कंपनी लवकरच आयफोन 15 प्रो आणि त्यानंतर रिलीज झालेल्या डिव्हाईससाठी अ‍ॅपल इंटेलिजेंस फीचर्स रिलीज करू शकते. कंपनी सध्या ईयू आणि चीनमध्ये हे फीचर रिलीज करणार नाही.

जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

कोणत्या आयफोन्स मिळणार नवे अपडेट

आयफोन 11 आणि त्यानंतर लाँच झालेल्या आयफोन मॉडेल्ससाठी आयओएस 27 चा सपोर्ट रिलीज केला जाणार आहे. आयफोन 11 पासून आयफोन 16 सिरीजपर्यंतच्या मॉडेल्ससाठी लेटेस्ट सॉफ्टवेयर अपडेट रिलीज केलं जाणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅपल iOS म्हणजे काय?

    Ans: iOS हे अ‍ॅपलच्या आयफोनसाठी विकसित केलेले मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे.

  • Que: iOS कोणत्या डिव्हाइसमध्ये वापरले जाते?

    Ans: iOS मुख्यतः आयफोनमध्ये वापरले जाते.

  • Que: iOS आणि अँड्रॉईडमध्ये काय फरक आहे?

    Ans: iOS हे अ‍ॅपलचे बंद इकोसिस्टम असलेले ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर Android हे विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये वापरले जाते.

Web Title: Apple unveils ios 27 at wwdc 2026 users will get faster performance and new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • tech event

संबंधित बातम्या

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
1

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर
2

Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अ‍ॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
3

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
4

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.