जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक
जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
फोटो, व्हिडीओ, कॉन्टॅक्ट्सपासून ईमेल, बँकिंग अॅप्स, पासवर्ड आणि सोशल मीडिया लॉगिनपर्यंत आपली सर्व माहिती स्मार्टफोनमध्ये सेव्ह असते. जर हा डेटा तुम्ही स्मार्टफोनमधून योग्य पद्धतीने डिलीट केला नाही आणि हा डेटा एखाद्या चुकीच्या हाती लागला तर अनेक मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे स्मार्टफोन विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण कामं करणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोनमधील सर्व डेटा डिलीट करण्यापूर्वी बॅकअप घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व महत्त्वाचा डेटा एका सुरक्षित ठिकाणी सेव्ह करा. फोनमधील डेटा सेव्ह करण्यासाठी गुगल ड्राइव्ह, आयक्लॉड किंवा वनड्राइव्ह सारख्या क्लाऊड स्टोरेजचा वापर करू शकता. फोनमधील डेटा लॅपटॉप/हार्ड ड्राइवमध्ये ट्रांसफर करू शकता. यामुळे तुमच्या आठवणी आणि महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित राहतील आणि नंतर कोणतीही अडचण येणार नाही.
फोनमधून सर्व डेटा डिलीट करणं पुरेसं नाही. अकाऊंटमधून लॉगआउट करणं देखील गरजेचं आहे. अँड्रॉईड यूजर्ससाठी गूगल अकाऊंटमधून साईन आऊट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फाईंड माय डिव्हाईस बंद करा. सर्व संबंधित अकाऊंट्स डिलीट करा. जर तुम्ही आयफोन यूजर असाल तर अॅपल आयडीमधून लॉगआऊट करा. फाईंड माय आयफोन बंद करा. डिव्हाइसमधून आयक्लाऊड अकाऊंट काढून टाका. ही स्टेप वगळल्यास नवीन यूजरला फोन सक्रिय करताना अडचण येऊ शकते.
तुमच्या स्मार्टफोनमधील बँकिंग आणि पेमेंट अॅप्स सर्वात जास्त संवेदनशिल असतात. त्यामुळे स्मार्टफोनमधील हे अॅप्स डिलीट करणं आणि यामधील सर्व माहिती हटवणं गरजेचं आहे. बँकिंग अॅप्समधून लॉगआउट करा. यूपीआय आणि डिजिटल वॉलेट अकाऊंट बंद करा. सेव्ह करण्यात आलेले पासवर्ड देखील डिलीट करा. केवळ अॅप्स अनइंस्टॉल केल्यास डेटा पूर्णपणे हटवला जात नाही, त्यामुळे लॉगआऊट करणं देखील गरजेचं आहे.
जेव्हा संपूर्ण बॅकअप आणि लॉगआउट पूर्ण होईल, त्यावेळी फॅक्ट्री रिसेट करा. यामुळे फोनमधील सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट होईल. अॅप्स आणि सेटिंग्ज हटवली जाईल. अकाऊंट आणि सिस्टिम डेटा पूर्णपणे पुसून टाकला जातो. अधिक चांगल्या सुरक्षेसाठी, कोणताही डेटा शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी काही लोक हे दोनदा देखील करतात.






