iPhone च्या 20 व्या अॅनिव्हर्सरी Apple देणार मोठं सरप्राइज! Foldable iPhone, स्मार्ट ग्लासेस आणि बरचं काही...
टेकजायंट कंपनी Apple चं सर्वात मोठं आणि लोकप्रिय प्रोडक्ट म्हणजे आयफोन. आयफोनची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हा सर्वांचा आवडता आयफोन येत्या 2 वर्षांत 20 वर्षांचा टप्पा गाठणार आहे. म्हणजेच 2027 मध्ये आयफोनचा 20 वा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल या ईव्हेंटला अजून 2 वर्ष बाकी आहे, मग या बातम्या आतापासूनच का? अहो ईव्हेंटला 2 वर्ष बाकी असली तरी त्याची तयारी आणि अपडेट्स आतापासूनच सुरु झाले आहेत.
गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी
2027 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्टस लाँच केले जावेत यासाठी कंपनी आतापासूनच तयारी करत आहे. यासंबंधित लिक्स देखील आता समोर येऊ लागले आहेत. असं सांगितलं जात आहे की, कंपनी सध्या अनेक प्रोडक्ट्सची चाचणी करत आहे. हे प्रोड्क्ट्स 2027 मध्ये होणाऱ्या ईव्हेंटमध्ये लाँच केले जाणार आहेत. यातील पहिलं प्रोडक्ट असणार आहे बहुप्रतिक्षित फोल्डेबल iPhone. ज्या फोल्डेबल iPhone ची गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहिली जात आहे, तो आयफोन 2027 च्या ईव्हेंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोल्डेबल iPhone गेल्या अनेक वर्षांपासून डेवलपमेंट प्रोसेसमध्ये आहे. ईव्हेंटमध्ये कंपनी केवळ फोल्डेबल आयफोनचं नाही तर Meta Ray-Ban Glasses ला टक्कर देण्यासाठी स्मार्ट ग्लासेस लाँच करू शकते. चला तर मग आता 2 वर्षांनंतर आयोजित केल्या जाणाऱ्या कंपनीच्या या सर्वात मोठ्या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार, आयफोनचा 20 वा वर्धापनदिन साजरा करताना फोल्डेबल iPhone लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनी पहिला Curved iPhone देखील लाँच करू शकते. हे डिव्हाईस देखील 2027 मध्येच लाँच केलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्याही कटआउट शिवाय स्क्रिन पहायला मिळणार आहे, ज्यामध्ये एक अंडर-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा आणि बायोमेट्रिकसाठी फेस आयडी सेंसर दिसणार आहे.
कर्व्ड स्क्रीन वाला iPhone, iPhone X चा 10 वा वर्धापन दिन देखील साजरा करणार आहे, ज्याने कंपनीला होम बटण फोनपासून ऑल-स्क्रीन ग्लास-फोकस्ड हँडसेटमध्ये रूपांतरित केले. गुरमनच्या मते, कंपनी या काळात आपला पहिला स्मार्ट ग्लास देखील लाँच करू शकते. कंपनी या डिव्हाईससाठी एक डेडिकेटेड चिप बनवण्याची योजना आखत आहे आणि ती मेटाच्या रे-बॅन चष्म्यासारखी असू शकते.
फोल्डेबल iPhone, कर्व्ड iPhone आणि स्मार्ट ग्लास या सर्व प्रोडक्ट्ससोबतच 2027 पर्यंत नवीन AirPods आणि नवीन Apple Watch देखील लाँच केले जाणार आहेत. याशिवाय इतर अनेक प्रोडक्ट्स देखील लाँच केले जाणार आहे. यामध्ये रोबोटिक आर्म वाला टेबलटॉप डिव्हाईस असण्याची शक्यता आहे.