गेमर्ससाठी Lenovo घेऊन आलाय खास Tablet! 7600mAh बॅटरी आणि मिळणार हे खास फीचर्स, किंमत केवळ इतकी
गेमर्सची सतत एकच तक्रार असते, गेम खेळताना स्मार्टफोन किंवा टॅब्लेट हँग होतो. तुमची देखील हीच तक्रार असेल तर आता नवीन लॅपटॉप खरेदी करण्याची वेळ आली आहे. तुम्ही टेक कंपनी Lenovo ने लाँच केलेला नवीन गेमिंग टॅब्लेटचा विचार करू शकता. Lenovo ने Lenovo Legion Y700 Gen 4 हा नवीन गेमिंग टॅब्लेट चीनमध्ये लाँच केला आहे.
Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त आपल्या आईला गिफ्ट करा हे Useful Gadgets, मदर्स डे होईल खास
हा टॅब्लेट Qualcomm च्या ऑक्टा-कोर फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि 16GB पर्यंत रॅम या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. हा टॅब्लेट Legion सीरीजप्रमाणेच, गेमिंग-फोकस्ड डिव्हाइस आहे, ज्यामध्ये 8.8-इंच 165Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 12,000 sq mm ची मोठी वेपर कूलिंग सिस्टम आहे. या टॅब्लेटमध्ये आधीच्या मॉडेलपेक्षा पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. म्हणजेच कंपनीने हे नवीन मॉडल पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक अपग्रेड केलं आहे. शिवाय यातील स्पेसिफिकेशन्स देखील सुधारण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन गेमिंग टॅब्लेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा ऑप्शन बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – X)
lenovo Legion Y700 Gen 4 हा टॅब्लेट चीनमध्ये दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 12GB+256GB आणि 16GB+512GB यांचा समावेश आहे. lenovo Legion Y700 Gen 4 च्या 12GB+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये आणि 16GB+512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 3,799 म्हणजेच सुमारे 44,900 रुपये आहे. हा टॅब्लेट काळा आणि सफेद रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा टॅब्लेट Lenovo China ई-स्टोर वरून खरेदी केला जाऊ शकतो.
लेनोवो Legion Y700 Gen 4 मध्ये 8.8-इंच स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये रेजोल्यूशन 3,040×1,904 पिक्सेल, 165Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सँपलिंग रेट, 600 निट्स ब्राइटनेस, 12-बिट कलर डेप्थ आणि हाई DCI-P3 कलर कवरेज आहे. डिस्प्लेमध्ये TÜV Rheinland सर्टिफिकेशन्स आहे, जे लो फ्लिकर, लो ब्लू लाइट आणि आई-प्रोटेक्शनसाठी देण्यात आलं आहे.
हा गेमिंग टॅब्लेट ऑक्टा-कोर Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 12,000 sq mm चा वेपर चेंबर कूलिंग सिस्टम आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये Centre Cooling Architecture 2.0 आहे, जे हेवी यूज दरम्यान डिव्हाईसचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी मदत करतो.
Lenovo Legion Y700 Gen 4 मध्ये 7,600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे बायपास चार्जिंग टेक्नोलॉजीला देखील सपोर्ट करतो, जे गेमर्ससाठी अत्यंत फायद्याचे फीचर आहे.