WhatsApp Update: मेसेजिंग अॅपचे हे हिडीन फिचर्स एकदा वापरून तर बघा! मित्रांसोबत चॅटिंग होईल आणखी मजेदार
दोन मिलियनहून अधिक लोकं मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर करतात. याच यूजरसाठी व्हॉट्सॲप नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असतो. युजर्ससाठी व्हॉट्सॲपने आतापर्यंत अनेक फीचर्स लाँच केल आहेत. मात्र यातील काही फिचर्स यूजरसाठी हिडन ट्रिक्स असू शकतात. याच हिडन फिचर्समुळे तुमची प्राइवेसी, पर्सनलाइजेशन आणि प्रोडक्टिविटी एका वेगळा लेव्हलवर नेऊन ठेवते. चला तर मग WhatsApp च्या या खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया. हे असे फिचर्स आहेत ज्यामुळे तुमचा WhatsApp वापरण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो.
तुम्ही तुमचे पर्सनल चॅट्स पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस आईडीच्या मदतीने सुरक्षित ठेवू शकता. याचा फायदा म्हणजे इतर कोणी तुमचे लॉक चॅट्स ओपन करू शकत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हॉटसअप अकाउंट वापरू शकणार आहात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या कामासाठी आणि वैयक्तिक चॅट्ससाठी वेगवेगळे व्हाट्सअप अकाउंट वापरू शकता. त्यामुळे आता तुम्हाला दोन मोबाईल वापरण्याची गरज नाही.
व्हाट्सअपमध्ये मेटा AI जोडण्यात आला आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर अगदी सहज मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी गुगल सर्च करावे लागणार नाही.
जर तुम्ही एखादी सरप्राइज पार्टी प्लॅन करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत काही महत्वाचे डिटेल शेअर करत असाल हा पर्याय तुमच्यातही फायद्याचा आहे. यामुळे तुमच्या चॅट्सला अतिरिक्त सुरक्षा मिळते.
जर तुम्ही चुकुन एखादा मेसेजवर “Delete for Me” क्लिक केले आणि मेसेज गायब झाला तर तुम्ही “Undo Delete for Me” करून मेसेज रिस्टोअर करू शकता.
तुम्ही तुमच्या फोटोंचे आणि इतर इमेजचे स्टिकर करू शकता. AI च्या मदतीने तुम्ही नवीन आणि हटके फिचर्स तयार करू शकता.
तुम्हाला मॅच स्कोअर किंवा बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर त्यासाठी देखील मेटा AI मदत ककरणार आहे.
जर तुम्हाला एखाद्या नवीन नंबरवर मेसेज करायचं अस तर आता हा नंबर सेव्ह करण्याची गरज नाही. युजर्स नंबर सेव्ह न करता देखील त्या नंबरवर मेसेज करू शकतात.
जर तुम्ही कोणतेही टाइप केले आहे किंवा चुकीची माहिती पाठवली आहे, तो संदेश डिलीट करण्यासाठी साइट संपादित करू शकता.