सेकेंड-हँड iPhone ची वाढतेय क्रेझ! तुम्हीही खरेदी करण्याचा विचार करताय? लक्षात ठेवा 'या' Useful Tips
केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आयफोनची क्रेझ वाढली आहे. नवीन आयफोन लाँच होताच, तो खरेदी करण्यासाठी स्टोअरच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागतात. इतकचं नाही तर नवीन आयफोन लाँच होताच जुन्या आयफोनच्या किंमतीत प्रचंड घट होते. त्यामुळे केवळ नवीन आयफोनचीच नाही तर जुन्या आयफोनची विक्री देखील प्रचंड वाढते. मात्र असं असलं तरी देखील आयफोनच्या किंमती प्रत्येकाच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे अनेकजण असे असतात जे नवीन आणि महागडा आयफोन खरेदी करण्यापेक्षा सेकेंडहँड आयफोन खरेदी करतात.
सेकेंडहँड आयफोन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा आपली फसवणूक केली जाऊ शकते. एका रिपोर्टनुसार, सेकेंडहँड आयफोन नवीन आयफोनपेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी स्वस्त असतो. त्यामुळे लोकं नवीन आयफोन खरेदी करण्यापेक्षा सेकेंडहँड आयफोन खरेदी करतात. अनेक युजर्स कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर किंवा हेडफोन जॅकच्या सुविधेसाठी सेकेंडहँड आयफोन खरेदी करतात. तर अनेकजण जास्तीचे पैसे खर्च करावे लागू नयेत, म्हणून सेकेंडहँड आयफोन खरेदी करतात. आयफोन जरी जुना असला तरी देखील तो कॅमेरा क्वालिटी, सिक्योरिटी आणि स्पीडमध्ये कोणतीही कमी सोडत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
मार्केट रिसर्च फर्म CCS Insight ने दिलेल्या माहितीनुसार, रिफर्बिश्ड यूज्ड फोनची किंमत नव्या फोनपेक्षा 15 ते 20 टक्क्यांनी कमी असते. सेकेंडहँड आयफोन खरेदी करताना ऑनलाईन स्टोअर्सपेक्षा ओळखींच्या दुकानदारांना प्राधान्य द्या. जर तुम्ही सेकेंडहँड आयफोन ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon, BestBuy आणि डेडिकेटेड रिफर्बिश्ड इलेक्ट्रॉनिक्स प्लेटफॉर्म्स तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. पण खरेदी करण्यापूर्वी कस्टमर रिव्यूज, रिटर्न पॉलिसी याबाबत सर्व माहिती घ्या.
रिफर्बिश्ड फोन्समध्ये यूज्ड बॅटरी असते. Apple-सर्टिफाइड रिफर्बिश्ड फोन्समध्ये नवीन बॅटरी नवीन आउटर शेल, नवीन चार्जिंग केबल आणि एका वर्षाची वॉरंटी मिळते.
अनेक प्लेटफॉर्म्सची यूज्ड फोन्स ग्रेडिंगची वेगवेगळी पद्धत असते. याबाबत संबंधित प्लॅटफॉर्मवर माहिती दिली जाते.
सेकेंडहँड आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन जेनरशन जुनाच आयफोनच खरेदी करा. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, पाच ते सहा जेनरशन जुना आयफोन खरेदी करणं टाळा. कारण अशा आयफोन्सचा iOS ऑपरेटिंग सिस्टम सपोर्ट काढून टाकला जातो. ज्यामुळे डेटा लिक होण्याचा धोका वाढतो. शिवाय हॅकर्सची भिती देखील मोठ्या प्रमाणात असते.
iPhone मध्ये वॉटर डॅमेज चेक करण्यासाठी Liquid Contact Indicator (LCI) तपासा. ते सिम कार्ड ट्रेच्या भागात असते आणि पाण्याच्या संपर्कात आल्यावर लाल होते. टॉर्चने LCI स्पष्टपणे पहा. जर तो पांढरा किंवा चांदीचा असेल तर फोन पाण्याने खराब झालेला नसण्याची शक्यता आहे.