Android 16 च्या डिझाईनमध्ये झाला बदल, मोबाइल स्क्रीन आणि फीचर्स वापरताना आता युजर्सना मिळणार नवा अनुभव
सर्व अँड्रॉईड युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमच्या स्मार्टफोनचा लूक बदलणार आहे. फक्त लूकच नाही तर युजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव देखील बदलणार आहे. याचं कारण म्हणजे आता Google लवकरच Android 16 नावाचे नवीन मोबाइल सिस्टम अपडेट घेऊन येणार आहे. यामुळे आता खूप मोठा बदल होणार आहे. Android 16 मुळे मोबाईलची स्क्रीन आणि फीचर्स दोन्हींंमध्ये मोठे बदल होणार आहेत.
या नवीन अपडेटनंतर लॉक स्क्रीनवर नवीन विजेट (घड्याळ, हवामानअपडेट, कॅलेंडर) पाहायला मिळायला येणार आहे. मोबाइलच्या वरच्या लाइनवर, म्हणजेच स्टेटस बार आणि फास्ट सेटिंग्सवाला पॅनल देखील आता नवीन आणि सुटसुटीत दिसणार आहे. बॅटरी आणि चार्जिंगचा आयकॉन आता iPhone प्रमणे दिसणार आहे, जो पाहताना पूर्वीपेक्षा अधिक चांगला वाटणार आहे. Google या नवीन Android 16 ला 13 मे रोजी एका खास ईव्हेंटमध्ये सादर करणार आहे, जिथे अनेकांना या नवीन अपडेटची झलक पाहायला मिळणार आहे. हे नवीन अपडेट सर्व युजर्ससाठी कधी रोलआऊट केलं जाणार याबाबत अद्याप माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
Android 16 मध्ये स्टेटस बारचा लूक पूर्णपणे बदलणार आहे. आता 5G चं निशान पूर्वीपेक्षा अधिक मोठं आणि साफ दिसणार आहे. घड्याळ आता मोबाइल स्क्रीनच्या डावीकडे मोठ्या आकारात दिसणार आहे. क्विक सेटिंग्समध्ये देखील अनेक बदल केले जाणार आहेत. आता Wi-Fi आणि ब्लूटूथ एकाच ठिकाणाहून कंट्रोल केलं जाणार आहे. याशिवाय एक नवीन टाइल एडिटर देखील पाहायला मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही शॉर्टकट बटन (टाइल्स) ला तुमच्या हिशोबाने सेट करू शकता. टाइल्सचा आकार देखील बदलू शकतो. स्क्रीनचा ब्राईटनेस देखील कमी किंवा जास्त करण्यासाठी ब्राइटनेस स्लाइडर एका नव्या डिझाईनमध्ये सादर केलं जाणार आहे.
इमोट, कॅरेक्टर आणि गन स्किनसह मिळणार बरंच काही… ‘हे’ आहेत आजचे Free Fire Max Redeem Codes
UI मध्ये मिळणार अनेक नवीन फीचर्स मिळणार आहेत. Google आता त्याच्या मोबाईल सिस्टममध्ये आणखी एक मोठा बदल करणार आहे. अॅप ड्रॉअर, पिन टाकणारी स्क्रीन आणि अलीकडेच उघडलेल्या अॅप्स मेनूमध्ये थोडीशी अस्पष्ट पार्श्वभूमी दिसेल, ज्यामुळे स्क्रीन अधिक सुंदर दिसेल. आता टाईमच्या खाली तारीख आणि हवामान अपडेट देखील मिळणार आहे. याशिवाय एक छोटा नोटिफिकेशन बटन देखील मिळणार आहे, जो लॉक स्क्रीनवर अनेक नोटिफिकेशन एकाच ठिकाणी दाखवणार आहे.
आता अँड्रॉइड 16 मध्ये, व्हॉल्यूम वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी स्लायडर देखील नवीन आणि अधिक स्टायलिश दिसेल. पूर्वीच्या जाड गोळीसारख्या आकाराऐवजी, आता त्यात एक सडपातळ आणि सुंदर डिझाइन असेल, जे गुगलच्या नवीन Material Design 3 नुसार आहे. संगीत किंवा व्हिडिओ प्ले करताना डिव्हाइस बदलण्याच्या पर्यायातही बदल करण्यात आले आहेत. आता ‘कनेक्ट अ डिव्हाइस’ बटण वरती दिसेल आणि ते पूर्वीपेक्षा लहान असेल.