36 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा Samsung चा हा प्रिमियम स्मार्टफोन, Amazon समर सेलमध्ये मिळतेय खास Deal
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर ग्रेट समर सेल सुरु झाला आहे. हा सेल म्हणजे शॉपिंगची सुवर्णसंधी आहे. या सेलमध्ये कपड्यांपासून घरगुती वस्तूंपर्यंत आणि हेडफोन्सपासून स्मार्टफोनपर्यंत अनेक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला लोकप्रिय कंपनी सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अगदी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. हा स्मार्टफोन आहे Samsung Galaxy S24 FE. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनवर आता आकर्षक डिस्काऊंट दिलं जाणार आहे. कंपनीच्या या ऑफर्स आणि स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
Samsung Galaxy S24 FE च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाल्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. हा स्मार्टफोन डिस्काऊंटसह 36 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. खरं तर हा स्मार्टफोन भारतात 59,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर त्याची किंमत प्रचंड कमी झाली आहे. याशिवाय या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहक निवडक बँक कार्ड्सवर ऑफर्स आणि कॅशबॅकचा फायदा घेऊ शकतात. हा स्मार्टफोन क्लीन यूजर इंटरफेस, अच्छी परफॉर्मंस, उत्तम कॅमेरा आणि डिजाइन ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S24 FE चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट 59,999 रुपयांच्या किंंमतीत लाँच करण्यात आला आहे. आता हा स्मार्टफोन 35,949 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर 24,050 रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. प्राइम मेंबर्स Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डचा वापर करून 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. याशिवाय जुन्या डिव्हाईसच्या एक्सचेंजवर 34,000 रुपांपर्यंतचा फायदा होणार आहे. शिवाय ग्राहक नो-कॉस्ट EMI ऑप्शनचा फायदा देखील घेऊ शकतात.
Samsung Galaxy S24 FE मध्ये 6.7-इंच FHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz एडाप्टिव रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोनमध्ये Exynos 2400e प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. यामध्ये Galaxy AI फीचर्स जसं की सर्कल टू सर्च, लाइव ट्रांसलेट, नोट असिस्ट, जनरेटिव एडिट आणि पोर्ट्रेट स्टूडियो यांचा समावेश आहे.
मजबूती आणि स्टाईलचं उत्तम कॉम्बिनेशन आहे Realme चा हा स्मार्टफोन, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये रियर पॅनलवर 50MP प्राइमरी सेंसर, 3x ऑप्टिकल झूमसह 8MP टेलीफोटो लेंस आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेंस आहे. फ्रंटला सेल्फीसाठी 10MP सेल्फी कॅमेरा आहे.
Galaxy S24 FE मध्ये 4,700mAh बॅटरी आहे, जी 25W चार्जिंग सपोर्ट करते. या फोन व्यतिरिक्त, ग्राहक Amazon India च्या साईटवर इतर डील देखील पाहू शकतात. सेलमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.