Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या

Drip Pricing Scam: ऑनलाईन शॉपिंग कंपन्या ग्राहकांकडून जे हिडन चार्जेस आकरतात त्याला ड्रिप प्राइसिंग स्कॅम असं म्हटलं जातं. यामुळे ग्राहकांची फसवणूक केली जाते आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 26, 2025 | 11:26 AM
ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या

ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी अ‍ॅप्सच्या हिडन चार्जेसमुळे तुम्हीही वैतागला आहात? कुठे आणि कशी करायची तक्रार? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • हीडन चार्जेसने वैतागले आहात?
  • ड्रिप प्राइसिंग स्कॅम विरोधात कशी करावी तक्रार?
  • फसवणूक झाल्यास घाबरू नका, त्याविरोधात तक्रार दाखल करा

दिवाळीच्या निमित्ताने ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरु होता. या सेलमध्ये ग्राहकांना महागडे प्रोडक्ट्स देखील कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होते. म्हणजेच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये महागड्या प्रोडक्ट्सवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात होतं. त्यामुळे ग्राहकांची बचत देखील झाली याशिवाय त्यांना नवीन प्रोडक्ट्सची खरेदी करण्याची संधी देखील मिळाली. याशिवाय झेप्टो आणि स्विगीवर देखील फेस्टिवल ऑफर्स सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र काही प्लॅटफॉर्म असे देखील होते जिथे हिडन चार्जेस आकारून ग्राहकांची फसवणूक केली जात होती.

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या

काही प्लॅटफॉर्म्सवर प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट उपलब्ध असल्याचे दाखवले जात होते. मात्र ग्राहक जेव्हा संबंधित प्रोडक्ट त्यांच्या कार्टमध्ये अ‍ॅड करून खरेदी करण्यासाठी क्लिक करत होते, तेव्हा हिडन फी अप्लाय करून त्या प्रोडक्टच्या खऱ्या किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात होते. यालाच ड्रिप प्राइसिंग स्कॅम असं म्हणतात. याबाबत अनेक ग्राहकांना त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तक्रार केली होती. आता सरकारने याची दखल घेतली असून कंपन्यांना याबाबत वार्निंग दिली आहे. तुम्ही देखील अशा एखाद्या स्कॅमचे शिकार झाला असाल तर त्याबाबत केवळ सोशल मीडियावर तक्रार करणं योग्य नाही. तुम्हाला या स्कॅमविरोधात रितसर तक्रार दाखल करावी लागणार आहे. या स्कॅमविरोधात कशा पद्धतीने तक्रार दाखल करावी, याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ड्रिप प्राइसिंग स्कॅम काय असतो?

असे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत जे ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी डार्क पॅटर्नचा वापर करतात. यामध्ये सर्वात आधी कोणत्याही प्रोडक्टवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जातं. मात्र जेव्हा ग्राहक ते प्रोडक्ट ऑर्डर करतात तेव्हा त्यांना जास्तीचे पैसे भरावे लागतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला डिस्काऊंट आणि ऑफरनंतर एखादे स्मार्टवॉच 1,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असलेले दिसत आहे. मात्र जेव्हा ग्राहक हे स्मार्टवॉच त्यांच्या कार्टमध्ये अ‍ॅड करतात तेव्हा त्यांची किंमत प्रचंड वाढते. कारण तेव्हा कंपनी हिडन चार्जेज अप्लाय करते, ज्याची माहिती ग्राहकांना आधी दिली जात नाही. यालाच ड्रिप प्राइसिंग स्कॅम असं म्हटलं जातं.

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

ड्रिप प्राइसिंग स्कॅम विरोधात तक्रार कशी दाखल करावी?

जर तुम्ही देखील ड्रिप प्राइसिंग स्कॅमचे शिकार झाला असाल किंवा तुम्हाला देखील एखादे प्रोडक्ट खरेदी करताना जास्तीचे पैसे भरावे लागले आहेत का? तर तुम्ही देखील अगदी सोप्या पद्धतीने त्याविरोधात तक्रार दाखल करू शकणार आहात. अशा परिस्थितीत नॅशनल कंज्यूमर हेल्पलाइन तुमची मदत करणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वात आधी 1915 नंबरवर कॉल करून प्रोडक्ट आणि प्लॅटफॉर्मविरोधात तक्रार दाखल करावी लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन प्रकरणाची चौकशी करेल आणि तुम्हाला मदत करेल. अशा प्रकारे, तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी ऑनलाइन खरेदी आणि ऑर्डरिंगचा अनुभव सुधारू शकता.

Web Title: Are you also tired of hidden charges of e commerce and food delivery apps know how you can do complain against it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या
1

Smartwatch vs Smart Band: दोन्हीमध्ये नेमका फरक काय? कोणतं गॅझेट खरेदी करणं तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर?जाणून घ्या

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या
2

इंटरनेटची स्पीड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Wi-Fi 8 ची चाचणी झाली सुरु, लवकरच दूर होणार Buffering ची समस्या

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन
3

Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक
4

iPhone 18 Pro Updates: आगामी आयफोन मॉडेलमध्ये मिळणार सॅटेलाइट 5G सर्विस, Apple चा गेम चेंजर अपडेट लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.