Jio–Airtel ला टक्कर देण्यासाठी मस्क सज्ज! भारतात लवकरच होणार Starlink ची एंट्री, या 9 शहरांत स्थापन करणार सॅटेलाईट स्टेशन
असं सांगितलं जात आहे की, स्टारलिंक कंपनी भारतातील मुंबई, चंडीगड, नोएडा, हैदराबाद, कोलकाता आणि लखनौ इत्यादी 9 शहरांत सॅटेलाईट स्टेशनची उभारणी करणार आहे. यामुळे युजर्सना हाय-स्पीड इंटरनेट प्रोवाइड करण्यासाठी मदत करणार आहे. याशिवाय सरकारने स्टारलिंकसाठी काही अटी घातल्या आहेत, त्यामुळे कंपनीला भारताती या अटींचे पालन करूनचं काम करावं लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टारलिंकने भारतात त्यांची सर्विस लाँच करण्यासाठी काम सुरु केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने त्यांच्या Gen 1 कॉन्स्टेलेशनसाठी 600 Gbps च्या कॅपिसिटीसाठी अप्लाय केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, दूरसंचार विभागने स्टारलिंकला सिक्योरिटी स्टँडर्ड व्हेरिफाय करण्यासाठी ता प्रोविजनल स्पेक्ट्रम दिले आहे. याच्या मदतीने कंपनी फिक्स्ड सॅटेलाइट सर्विसच्या डेमोसाठी 100 यूजर टर्मिनल इंपोर्ट करणार आहे.
स्टारलिंकला भारतात त्यांची सर्विस लागू करण्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. कंपनीने त्यांचे स्टेशन्स ऑपरेट करण्यासाठी विदेशी टेक्निकल एक्सपर्ट्स आणण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत कंपनीला गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळत नाही तोपर्यंत फक्त भारतीय नागरिकच ही स्टेशन चालवतील.
याप्रमाणेच चाचणी टप्प्यात स्टारलिंकची सेवा सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसेल. यासोबतच चाचणीदरम्यान जनरेट होणारा सर्व डेटा भारतात सुरक्षितपणे स्टोअर केला जाणार आहे, ही सर्वात महत्त्वाची अट देखील स्टारलिंकसाठी ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्टारलिंकने दर 15 दिवसांनी दूरसंचार विभागाला स्टेशन लोकेशन, यूजर टर्मिनल आणि यूजरच्या विशिष्ट लोकेशनसह एक अहवाल सादर करणे आवश्यक आहे.
रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंकला भारतात काम सुरु करण्यासाठी सॅटकॉम (सॅटेलाइट कम्युनिकेशन) कडून परवाना आणि दुसरे स्पेक्ट्रम वाटपसंबंधित परवाना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. 2025 च्या शेवटी हे दोन्ही परवाने मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2026 च्या पहिल्या तिमाहित सॅटेलाईट सर्विस भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, सुरुवातीला सरकारने स्टारलिंकच्या यूजरच्या संख्येवर मर्यादा घातली आहे, म्हणजेच कंपनी भारतात 20 लाखांपेक्षा जास्त कनेक्शन देऊ शकणार नाही.






