
YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
मिळालेल्या माहितीनुसार, युट्यूबचे कस्टम फीड्स फीचर यूजर्सना त्यांची आवड आणि गरजेच्या हिशोबाने वेगवेगळ्या व्हिडीओ फीड तयार करण्याची सुविधा देणार आहे. यासाठी यूजर्स अत्यंत सोप्या भाषेत सांगू शकतात की त्यांना कशा प्रकारचे व्हिडीओ पाहायचे आहेत. उदाहणार्थ एखादी व्यक्ती वर्कआउट व्हिडीओ, मोठे डॉक्यूमेंट्री व्हिडीओ किंवा एखाद्या खास कॅटेगरीमधील नव्या क्रिएटर्सच्या व्हिडीओसाठी एक वेगळी फीड तयार करू शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
या फीचरमध्ये एआय तुम्ही सांगितलेल्या आवडीनुसार, व्हिडीओ मॅनेज करणार आहे. रिपोर्टनुसार, यासाठी गूगलचे जेमिनी एआय मॉडेल वापरले जाणार आहे. तयार करण्यात आलेली फीड युट्यूबच्या होमपेजवर एका वेगळ्या टॅबच्या रुपात दिसाणार आहे. यूजर्स त्यांच्या गरजेच्या हिशोबाने एकापेक्षा जास्त कस्टम फीड देखील बनवू शकणार आहेत.
कस्टम फीड सुरुवातीला अमेरिकेतील यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर वेब, मोबाईल आणि टिव्हीवर लवकरच सुरु केले जाऊ शकते. याचा अर्थ असा आहे की, यूजर्स त्यांच्या वेगवेगळ्या मूड, आवड आणि रुटिनच्या हिशोबाने युट्यूब कंटेटची निवड करू शकणार आहेत. विशेष म्हणजेच, कस्टम फीड युट्यूबची आधीपासूनच उपलब्ध असलेली मुख्य फीड संपवणार नाही. याऐवजी यूजर्सना त्यांच्या गरजेच्या हिशोबाने वेगवेगळ्या फीडमध्ये स्विच करण्याचा पर्याय मिळणार आहे.
युट्युब कमेंट सेक्शनमध्ये देखील लवकरच एक मोठा बदल होणार आहे. यूजर्स आता व्हिडीओवर कमेंट करताना केवळ टेक्स्ट नाही तर जिआयएफचा देखील वापर करू शकणार आहेत. यासाठी प्लॅटफॉर्मवर जिआयएफची एक लायब्रेरी उपलब्ध असणार आहे, या ठिकाणी यूजर्स त्यांच्या आवडीचे जिआयएफ निवडून कमेंटमध्ये पेस्ट करू शकतात. हे फीचर जगभरातील युट्यूबच्या मोबाईल ॲपवर या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स त्यांच्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकणार आहेत.