Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान… ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक

विमान प्रवासात Power Bank वापरणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. तुमच्य एका चूकीमुळे विमानात गंभीर घटना घडू शकतात. यामुळे विमानात पावर बँक वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 10, 2026 | 01:55 PM
Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान... ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक

Power Bank Tips: फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताय? सावधान... ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लाइटमध्ये पावर बँक वापरताना निष्काळजीपणा केल्यास ब्लास्टसारख्या गंभीर घटना घडू शकतात.
  • स्वस्त किंवा खराब क्वालिटीच्या पावर बँकमुळे बॅटरी ओव्हरहिट होऊन आग लागण्याचा धोका वाढतो.
  • विमान प्रवासात पावर बँक नेहमी हँड लगेजमध्ये ठेवावी आणि ओव्हरचार्जिंग टाळावे.
Power Bank: हल्ली विमान प्रवासादरम्यान पावर बँक ब्लास्ट होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत तुमची एक छोटी चूक आणि थोडा निष्काळजीपणा देखील एका मोठ्या अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतो. अलीकडेच चंदीगडहून येणाऱ्या एका विमानात पॉवर बँकचा ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे सर्वच लोकं घाबरले होते. विमान प्रवासादरम्यान पावर बँकचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी आणि पावर बँकचा ब्लास्ट होण्याची कारणं कोणती आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.

Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… अशी आहे ऑफर

पावर बँक ब्लास्ट होण्याची ही आहेत कारणं

पावर बँकमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. जर ही बॅटरी जास्त गरम झाली, ओवरचार्ज झाली, तसेच शॉर्ट सर्किट किंवा या बॅटरीची क्वालिटी खराब असेल तर यामध्ये थर्मल रनअवे नावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीत बॅटरी अतिशय वेगाने गरम होते आणि धूर, आग किंवा ब्लास्टसारख्या घटना घडतात. (फोटो सौजन्य – Pinterest) 

फ्लाईटमध्ये पावर बँक घेऊन जाताय? या चुका करू नका

चेक-इन बॅगेजमध्ये पावर बँक ठेऊ नका

सहसा विमान कंपन्या प्रवाशांना त्यांच्या चेक-इन सामानात पावर बँक ठेवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे पावर बँक नेहमी तुमच्या हँड लगेजमध्ये ठेवा. जेणेकरून एखादी समस्या निर्माण झाली तर तुम्ही वेळीच परिस्थितीतीवर नियंत्रण मिळवू शकता आणि कोणतीही दुर्घटना घडणार नाही.

स्वस्त आणि लो क्वालिटीचे पावर बँक खरेदी करू नका

जर तुम्ही स्वस्त आणि सेफ्टी सर्टिफिकेशनशिवाय उपलब्ध असणाऱ्या पावर बँकचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. तुमच्या या चुकीमुळे तुम्हाला फार मोठं नुकसान होऊ शकतं. कारण स्वस्त आणि लो क्वालिटीचे पावर बँक लवकर गरम होतात आणि याचा ब्लास्ट होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नेहमी केवळ विश्वसनीय शाओमी, सॅमसंग किंवा इतर विश्वसनीय कंपन्यांचे पावर बँक खरेदी करा.

सतत चार्जिंग करणं टाळा

काही लोकं विमानात फोन आणि पावर बँकचा सतत वापर करतात. यामुळे बॅटरी गरम होते आणि दुर्घटना घडण्याची शक्यता असते. गरज नसल्यास पावर बँक सुरक्षितपणे बॅगमध्ये ठेवा. तसेच गरज नसल्यास सतत फोन आणि पावर बँकचा वापर करू नका.

डॅमेज किंवा खराब झालेल्या पावर बँकचा वापर करू नका

जर पावर बँक जास्त गरम झाला असेल, किंवा बॅटरी फुल्ल चार्ज असेल किंवा पावर बँकमधून जळण्याचा वास येत असेल तर त्याचा वापर करणं त्वरित बंद करा. अन्यथा पावर बँकमुळे विमानात मोठी दुर्घटना घडू शकते.

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

पावर बँकची कॅपेसिटी (mAh)

अनेक विमान कंपन्या 100Wh म्हणजेच 27,000 mAh क्षमता असलेले पावर बॅक हँड लगेजमध्ये ठेवण्याची परवानगी देतात. यापेक्षा जास्त क्षमतेचे पॉवर बँक सोबत बाळगल्यास सुरक्षा तपासणीत तपासणी होऊ शकते.

Web Title: Are you also using power bank during flight travel avoid these mistakes to prevent blast risks tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो
1

Mother’s Day 2026: यंदाच्या मदर्स डेनिमित्त आईला द्या डिजिटल सरप्राइज! Google Gemini च्या मदतीने तयार करा खास AI फोटो

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी
2

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी

Instagram वरील प्रायव्हसी संपली… अखेर कंपनीने हटवले ‘ते’ फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?
3

Instagram वरील प्रायव्हसी संपली… अखेर कंपनीने हटवले ‘ते’ फीचर, यूजर्सवर कसा होणार परिणाम?

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा
4

स्मार्टवॉच बनणार हेल्थ गार्ड! शुद्ध हरपण्याआधीच मिळणार इशारा? Samsung Galaxy Watch च्या नव्या फीचरची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.