Flipkart Sale 2026: केवळ 19,949 रुपयांत घरी आणा हा Vivo स्मार्टफोन! 7200mAh आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... अशी आहे ऑफर
सुमारे 28,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झालेला हा नवा Vivo T5x 5G आता सेलमध्ये 20 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत अनेक दमदार फीचर्सचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची स्टँडर्ड किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन केवळ 22,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. इतकंच नाही तर डिव्हाईसवर अनेक बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. विशेषतः, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरल्यावर ग्राहकांना 3,050 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे, ज्यामुळे ही डील आणखी आकर्षक बनते.
एसबीआय क्रेडीट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 2,000 रुपयांपर्यंत आणखी सूट मिळणार आहे. या सर्व ऑफर्सनंतर स्मार्टफोनची किंमत केवळ 19,939 रुपये होणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. हा पर्याय वापरून ग्राहक केवळ 3,500 रुपये देऊन स्मार्टफोन घरी घेऊन येऊ शकतात. या ऑफर्स व्यतिरिक्त, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला 21,850 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्य मिळू शकते
फोनमधील टॉप फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.76-इंच एफएचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि जास्त ब्राइटनेस आहे, जे स्मूद विजुअल्स आणि चांगली विजिबिलिटी ऑफर करते. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7400-टर्बो 5G प्रोसेसर आहे, जो गेमिंगसाठी ऑप्टिमाइज करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 7200mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये 50MP चा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.






