Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमिनीवर फेका नाहीतर टेबलवर आपटा! ‘हा’ मेड-इन-इंडिया टॅब्लेट अजिबात तूटणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला Video

Made In India Tablet: आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यातीलच एक व्हिडीओ म्हणजे मेड-इन-इंडिया टॅब्लेटचा. या टॅब्लेट मजबूत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 19, 2025 | 08:34 AM
जमिनीवर फेका नाहीतर टेबलवर आपटा! 'हा' मेड-इन-इंडिया टॅब्लेट अजिबात तूटणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला Video

जमिनीवर फेका नाहीतर टेबलवर आपटा! 'हा' मेड-इन-इंडिया टॅब्लेट अजिबात तूटणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला Video

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे मेड-इन-इंडिया टॅब्लेटचा. या टॅब्लेटची खासियत म्हणजे हा भारतात डिझाईन केला आहे, शिवाय हा टॅब्लेट अत्यंत टिकाऊ देखील आहे. म्हणजेच तुम्ही हा टॅब्लेट जमिनीवर फेकला किंला टेबलवर आपटला, तरी देखील त्याला काहीच होणार नाही. अहो, इतकंच नाही तर तुम्ही या टॅब्लेटवर उभं देखील राहू शकाता. तरीही त्याला काही होणार नाही.

मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!

अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर शेअर केलेला व्हिडीओ हा व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अश्विनी वैष्णव यांनी लिहीलं आहे की, ‘नाही तूटणार. डिझाईन इन इंडिया, मेड इन इंडिया.’ एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री मेड इन इंडिया टॅब्लेटच्या टिकाऊपणाची चाचणी घेताना दिसत आहेत.  (फोटो सौजन्य – X) 

नहीं टूटेगा! Designed in India, Made in India. pic.twitter.com/Ez6BpVasvJ — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 18, 2025

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, केंद्रीय मंत्री मेड इन इंडिया टॅब्लेट जमिनीवर फेकताना, उंचीवरून खाली टाकताना दिसत आहेत. एवढंच नाही टॅब्लेटवर उभं राहून केंद्रीय मंत्र्यांनी त्याचा टिकाऊपणा तपासला. या सर्व चाचण्यांमुळे भारतात तयार करण्यात आलेला हा टॅब्लेट किती टिकाऊ आहे, हे सिद्ध झालं, ही पोस्ट ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत स्वदेशी आणि उच्च-गुणवत्तेच्या इलेक्ट्रॉनिक्ससाठी भारताच्या वाढत्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.

केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ देखील व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील आहे. या व्हिडिओमध्ये, केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या AI सर्व्हर तंत्रज्ञानाची झलक ‘भारताचा एआय सर्व्हर… ‘व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज येथे अ‍ॅडिपोली’ या कॅप्शनसह शेअर केली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि उत्पादन प्रक्रियेबद्दल माहिती मिळवली. हा उपक्रम केंद्रीय मंत्र्यांच्या फेब्रुवारीमधील मागील पोस्टची आठवण करून देतो, ज्यामध्ये त्यांनी VVDN टेक्नॉलॉजीजचे “डिझाइन केलेले आणि भारतात बनवलेले” लॅपटॉप सादर केले होते.

India’s AI server… ‘Adipoli’ 👍 at VVDN Technologies pic.twitter.com/dJcRDxNYhx — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 18, 2025

खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत

हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. शिवाय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अधिक मजबूत कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशांतर्गत उत्पादनात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक सहाय्य देऊन उत्पादन-लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजनेने या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या वर्षी जानेवारीमध्ये, सरकारने माहिती दिली होती की आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय 2.0 योजनेने आधीच 10,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून अवघ्या 18 महिन्यांत 3,900 नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. हे सर्व भारताचे ऐतिहासिक यश असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या 10 महिन्यांत स्मार्टफोन भारतातील सर्वात मोठी निर्यात श्रेणी म्हणून उदयास आले आहेत, जी सरकारच्या पीएलआय योजनेअंतर्गत एक मोठी यशोगाथा आहे.

Web Title: Ashwini vaishnaw shared video of made in india tablet on x account tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • ashwini vaishnaw
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.