मिड रेंज सेगमेंटमध्ये भारतात आला Samsung चा नवा Smartphone, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीने सुसज्ज!
स्मार्टफोन आणि टेक कंपनी Samsung ने भारतीय बाजारात त्यांचे नवीन डिव्हाईस लाँच केले आहे. हे नवीन स्मार्टफोन डिव्हाईस भारतात Samsung Galaxy M56 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने गेल्या वर्षी Galaxy M55 स्मार्टफोन लाँच केला होता. आता नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M56 हा Galaxy M55 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस स्क्रीन प्रोटेक्शन, AI फीचर्स आणि लो-लाइट फोटोग्राफी फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लाँच करण्यात आलेल्या नवीन Samsung Galaxy M56 स्मार्टफोनला सहा वर्षांसाठी अपडेट्स मिळणार आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. शिवाय कंपनी या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर काही ऑफर्स आणि डिस्काऊंट देखील ऑफर करत आहे. त्यामुळे हा बजेट स्मार्टफोन ग्राहकांना आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याती संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
Samsung Galaxy M56 स्मार्टफोन भारतात 24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर्ससह खरेदी करता येईल. या फोनची विक्री 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे.
स्मार्टफोनवरील ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर या फोनवर 3000 रुपयांची फ्लॅट सूट उपलब्ध आहे. Samsung Galaxy M56 स्मार्टफोन लाइट ग्रीन आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
Samsung M56 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन आणि व्हिजन बूस्टर सपोर्ट आहे.
Samsung Galaxy M56 launched in India.
Price 💰 ₹27,999 (8GB+128GB)Specifications
📱 6.73″ FHD+ sAMOLED+ flat display 120Hz refresh rate, Gorilla glass victus+ protection
🔳 Exynos 1480 chipset
LPDDR5x RAM & UFS 3.1 storage
📸 50MP main+ 8MP Ultrawide+ 2MP macro camera
🤳 12MP… pic.twitter.com/W8tCPFwPNk— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 17, 2025
हा नवीन सॅमसंग फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8GB LPDDR5x रॅम आणि 128GB आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज आहे. या सॅमसंग फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
सॅमसंगचा लेटेस्ट फोन Android 15 OS वर आधारित One UI 7 कस्टम स्किनवर चालतो. या फोनमध्ये AI Eraser, Edit Suggestions आणि Image Clipper सारखे AI फीचर्स उपलब्ध आहेत. या सॅमसंग फोनसाठी, कंपनी 6 वर्षांसाठी अँड्रॉइड आणि सुरक्षा अपडेट जारी करेल.
Samsung Galaxy M56 स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Samsung Galaxy M56 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर, या नवीन स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.