खुशखबरी! Instagram आणि Facebook प्रमाणेच आता Snapchat वरूनही करता येणार बंपर कमाई, वाचा पैसे कमवण्याची नवी पद्धत
हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेकांसाठी कमाईचे साधन बनले आहे. ज्याप्रमाणे लोकं ऑफीसमध्ये जाऊन 9 तास कामं करून पैसे कमावतात त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कंटेट क्रिएटर्स पैसे कमावू शकतात. कंटेट क्रिएटर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे व्हिडीओ आणि रिल्स अपलोड करून चांगले पैसे कमावू शकतात. या सर्वांमुळेच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेक लोकांसाठी कमाईचे साधन बनले आहेत.
Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम
इंस्टाग्राम आणि फेसबुकवर कंटेट क्रिएटर्स व्हिडिओ आणि फोटो अपलोड करून भरपूर पैसे कमवतात. यामुळे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची तरूणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकसोबतच आणखी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तरूणांना वेड लावत आहे. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे स्नॅपचॅट. अनेकांना स्नॅपचॅटचं प्रचंड वेड असतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेकजण सतत स्नॅप पाठवत असतात. तुम्ही स्नॅपचॅट वापरणारे असे अनेक लोक पाहिले असतील. तसेच तुम्ही स्वत: देखील स्नॅपचॅट वापरत असाल. पण, तुम्हाला माहिती आहे का की इंस्टाग्राम आणि फेसबुकसोबतच स्नॅपचॅटमधूनही पैसे कमवता येतात? (फोटो सौजन्य – Pinterest)
स्नॅपचॅटचे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्य म्हणजे स्नॅप्स. तुम्ही स्नॅपचॅटवर स्नॅप-स्नॅप खेळणारे अनेक लोक पाहिले असतील. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभर काय काय केलं या सर्वांचे अपडेट्स स्नॅपवर मित्रांसोबत शेअर केले जातात. हे स्नॅप फोटो आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये मित्रांना पाठवता येतात. विशेष म्हणजे हे फोटो चॅटमध्ये फक्त काही सेकंदांसाठी दिसतात आणि नंतर गायब होतात. मित्रांनी पाठवलेले स्नॅप तुम्ही चॅटमध्ये सेव्ह देखील करू शकता.
स्नॅप पाठवण्यासाठी, तुम्हाला स्क्रीनच्या मध्यभागी असलेल्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करावे लागेल. तुम्ही फोटो काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमधून फोटो निवडू शकता. तुमचा स्नॅप अधिक मजेदार बनवण्यासाठी तुम्ही फिल्टर, स्टिकर्स आणि मजकूर देखील जोडू शकता. आता तुम्ही तुमच्या निवडलेल्या मित्रांना स्नॅप पाठवू शकता.
स्नॅपचॅटवर पैसे कमविण्याचा मार्ग म्हणजे स्पॉटलाइट फीचर. तुम्हाला तुमचे सर्वोत्तम व्हिडिओ स्नॅप्स स्पॉटलाइटवर अपलोड करावे लागतील. जर इतर स्नॅपचॅट युजर्सना तुमचा स्नॅप आवडला आणि त्यांनी पाहिला तर तुम्ही क्रिस्टल्स अवॉर्ड मिळवू शकता. तुम्ही नंतर या क्रिस्टल पुरस्कारांचे पैशात रूपांतर करू शकता.
येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की तुम्ही किती पैसे कमवाल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की किती लोक तुमच्या स्नॅपकडे लक्ष देतात आणि लाईक करतात. इतर लोकांचे स्पॉटलाइट व्हिडिओ कसे काम करत आहेत यावर देखील ते अवलंबून असते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुमचा स्नॅप इतर लोकांच्या स्नॅप्सपेक्षा चांगला आणि मजेदार असावा, तरच तुम्ही पैसे कमवू शकाल.