टेक्नोलॉजी क्षेत्रातील बाबा वेंगा यांची भयानक भविष्यवाणी! स्मार्टफोन युजर्सची उडणार झोप, वाचा सविस्तर
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी वाचल्यानंतर अनेकदा लोकांच्या पायाखालची जमिन सरकते. कारण बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपृर्वी काही भविष्यवाणी लिहून ठेवल्या आहेत. या भविष्यवाणी खऱ्या होत असल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. बाबा वेंगा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील होणाऱ्या घटनांबद्दल आधिच भाकित केलं आहे. सर्व क्षेत्रांप्रमाणेच त्यांनी टेक्नोलॉजी क्षेत्रातील काही घटनांबद्दल देखील आधीच लिहून ठेवलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
AI करणार चेरीच्या झाडांची देखभाल, या देशाने तयार केली अनोखी Technology ! झाडे वाचवण्यासाठी होणार मदत
बाबा वेंगा यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी स्मार्टफोनच्या वापरबाबत एक भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी वाचून स्मार्टफोन युजर्सची झोपचं उडणार आहे. बाबा वेंगा यांचा मृत्यू 1997 साली झाला होता. त्यांना भविष्यात होणाऱ्या अनेक घटनांबाबत अधीच जाणीव झाली होती. बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये सांगितलं होतं की, 2022 साली लोकं स्क्रीनचा सर्वाधिक वापर करू लागणार आहेत. त्यांची ही भविष्यवाणी आता खरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्याच्या काळात घर असो किंवा ऑफीस लोक स्क्रीनवर त्यांचा सर्वाधिक वेळ घालवतात. यामुळे त्यांना अनेक आजारांचा देखील सामना करावा लागतो. सध्याच्या काळात आपली अनेक कामं मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय होणं कठिण आहे आणि यासाठीच आपल्याला सर्वाधिक वेळ आपल्या स्क्रिनवर घालवाला लागतो. हल्ली तुम्ही पाहिलं तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण स्क्रिनसोबत जोडलेले आहेत. सतत स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने वेगवेगळ्या आजारांना देखील सामोरं जावं लागत आहे. या सर्व गोष्टी कोणत्याही एका देशात नाही तर जगभरात सुरु आहेत. या सर्व घटनांबाबत बाबा वेंगा यांना आधीच जाणीव झाली होती. त्यांनी याबाबत 28 वर्षांपूर्वीच भाकित केलं होतं.
बाबा वेंगा यांनी सायबर गुन्ह्यांविषयी एक भाकीत अशा वेळी केले होते जेव्हा कोणीही आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच एआय बद्दल बोलतही नव्हते. बाबा वेंगा 1996 मध्ये मरण पावले आणि तोपर्यंत एआय सुरूही झाले नव्हते. तोपर्यंत केवळ इंटरनेटची ओळख झाली होती. बाबा वेंगा यांनी त्यावेळी भाकीत केले होते की हे इंटरनेट एक दिवस एक धोकादायक शस्त्र बनेल. बाबा वेंगा यांनी असेही भाकीत केले होते की एके दिवशी इंटरनेटच्या वापरामुळे सायबर हल्ले होऊ शकतात, ज्यामुळे लोकांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
जर आपण बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितांबद्दल बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, काही महिन्यांपूर्वीच, अॅपल आणि मेटा या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता, ज्याचा परिणाम जगातील बहुतेक देशांमध्ये जाणवला. आजच्या काळात हॅकिंगची अनेक प्रकरणेही समोर येत आहेत. दूर बसलेला माणूस फक्त लिंक उघडून लोकांचे फोन हॅक करू शकतो.
बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यावाणी खऱ्या ठरल्या आहेत. यामध्ये दूसरे विश्व युद्धाची भविष्यवाणी, 2004 मध्ये आलेली त्सुनामी, अमेरिकामध्ये11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला आतंकवादी हल्ला, स्टालिन आणि जार बोरिस III यांचा मृत्यू या सर्वांबाबत बाबा वेंगा यांना आधीच माहिती होतं.