Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? ‘हे’ आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

आजच्या डिजीटल जगात देखील असे अनेक लोकं आहेत, जे स्मार्टफोनला नाही तर फीचर फोन म्हणजेच किपॅड फोनला प्राधान्य देतात. याचं कारण म्हणजेच किपॅड फोनमध्ये कमी किंमतीत महत्त्वाचे फीचर्स ऑफर केले जातात. ज्यामुळे डिजीटल डिटॉक्स करण्यासाठी देखील मदत होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 10, 2026 | 01:03 PM
स्मार्टफोनला पर्याय शोधताय? 'हे' आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

स्मार्टफोनला पर्याय शोधताय? 'हे' आहेत 3 हजारांहून कमी किंमतीत मिळणारे बेस्ट 4G फीचर फोन, पाहा संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:
  • ₹1,299 पासून ₹2,369 पर्यंतच्या 4G फीचर फोनमध्ये कॉलिंग, मोठी बॅटरी आणि आवश्यक स्मार्ट फीचर्स मिळतात.
  • कार्बोन के 1 4G, एचएमडी 101 4G आणि लावा अ‍ॅक्शन 4G हे बजेटमध्ये चांगले पर्याय ठरू शकतात.
  • आयटेल सुपर गुरू 4G मॅक्स आणि नोकिया 106 4G मध्ये मोठी बॅटरी, यूपीआय, एफएम आणि ब्लूटूथसारखे फीचर्स मिळतात.
सध्या स्मार्टफोन आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. कॉलिंग, मेसेजिंगपासून सोशल मीडिया अपडेट्सपर्यंत आपलं आयुष्य स्मार्टफोनवर अवलंबून आहे. स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर, चांगला कॅमेरा आणि मोठी बॅटरी दिली जाते. म्हणजेच एकाच डिव्हाईसमध्ये अनेक काम होतात. यामुळेच बरेच लोकं स्मार्टफोन खरेदी करण्याला प्राधान्य देतात. स्मार्टफोन जरी महत्त्वाचे डिव्हाईस असले तरी असे अनेकजण सेकेंडरी फोन म्हणून किंवा डिजिटल डिटॉक्स करण्यासाठी किपॅड म्हणजेच फीचर फोन वापरतात.

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

तुम्ही देखील एखादा 4G फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? किंवा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याला 4G फीचर फोन गिफ्ट करायचा आहे का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आता आम्ही तुम्हाला 3 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या काही 4G फीचर फोन्सबद्दल सांगणार आहोत. हे फोन चांगला कॉलिंग अनुभव, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि यूपीआय सपोर्टसह इतर अनेक फीचर्स ऑफर करतात. चला तर मग 3 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या 4G फीचर फोन्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)

कार्बोन के 1 4G

कार्बोन के 1 4G हा बजेट फ्रेंडली फीचर फोन्सपैकी एक आहे. या फोनमध्ये 4G VoLTE कॉलिंगसपोर्टसोबतच स्मार्ट अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या फोनमध्ये मनोरंजनासाठी जिओहॉटस्टार, म्युझिकसाठी जिओ सावन आणि पेमेंटसाठी जिओ साऊंड पे प्री-इंस्टॉल आहेत. या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये डिजीटल कॅमेरा आणि 1,000mAh बॅटरी दिली आहे. या डिव्हाईसची किंमत 1,299 रुपये आहे. फोनमध्ये ब्लूटूथ, एफएम रेडिओ आणि वाढवता येणारी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. हा फोन 123 रुपयांच्या मंथली जिओ रिचार्ज प्लॅनला देखील सपोर्ट करतो, ज्याची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे आणि यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 14GB डेटा आणि 300 एसएमएस ऑफर केले जाातात.

एचएमडी 101 4G

एचएमडी 101 4G फोनमध्ये अधिक चांगल्या व्हॉईस कॉलिंग अनुभवासाठी 4G VoLTE सपोर्ट दिला आहे. हा फोन मजबूत हार्ड प्लास्टिक डिझाइनसह येतो, जो दैनंदिन वापरासाठी बनवला आहे. फोनमध्ये रुंद किपॅडसह 2 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 1,000mAh बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत 1,949 रुपये आहे. हे डिव्हाईस रिमुव्हेबल बॅटरी, वायरलेस एफएम रेडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आणि टॉर्चलाईटने सुसज्ज आहे. जर तुम्हाला दिर्घकाळ बॅटरीसह कॉलिंगसाठी फोन पाहिजे असेल तर एचएमडी 101 4G एक चांगला पर्याय ठरणार आहे.

लावा अ‍ॅक्शन 4G

हा फोन छोटा डिस्प्ले आणि डिजिटल कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. डिव्हाईसमध्ये 4G VoLTE सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये टाईप करण्यासाठी किपॅड आहे. हे डिव्हाईस वायरलेस एफएम, ब्लूटूथ, वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट करते. टाइप-सी पोर्टमुळे चार्जिंग करणं अधिक सोयीस्कर ठरतं. फोनमध्ये 1.8 डिस्प्ले आणि स्मार्ट अ‍ॅप सपोर्ट दिला आहे. या फोनची किंमत 1,879 रुपये आहे.

आयटेल सुपर गुरू 4G मॅक्स

हा या प्राईज सेगमेंटमधील एक फिचर पॅक्ड फोन आहे. यामध्ये 3 इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एआय (AI) व्हॉइस असिस्टंट सपोर्ट, ब्लूटूथ कॉलिंग, वायरलेस एफएम रेडिओ आणि मोठी बॅटरी दिली आहे. फोनमध्ये स्मार्ट अ‍ॅप सपोर्ट आणि फोटो क्लिक करण्यासाठी सिंगल कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 2,000mAh बॅटरी आहे. फोनची किंमत 2,369 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये वाढवता येणारी स्टोरेज क्षमता आहे. डिव्हाइस चार्ज करण्यासाठी यात ‘चार्जिंग डॉक’ देण्यात आला आहे.

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

नोकिया 106 4G

नोकिया 106 4G फोनशिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही. या फोनमध्ये 4G VoLTE, यूपीआय सपोर्ट आणि 1,450mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपी3 प्लेबॅक, ब्लूटूथ आणि वाढवता येणारी स्टोरेज क्षमता देखील आहे. या फोनची किंमत 2,324 रुपये आहे.

Web Title: Best 4g feature phones under rs 3000 affordable phones with long battery upi support and more tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह
1

नवा ट्रेंड की प्रायव्हसीचा धोका? कॅमेरा असलेल्या Smart Glasses ठरले चर्चेचा विषय, डेटा सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
2

Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा… जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर
3

Smartphone Tips: 0.5X पासून टेलिफोटोपर्यंत… काय आहे स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचं खरं काम? जाणून घ्या सविस्तर

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड
4

AI Job Layoffs : सांगताय काय? ज्या AI ची जगभर चर्चा, त्याच क्षेत्रात हाहाःकार? 66% कर्मचाऱ्यांवर… धक्कादायक वास्तव उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.