Tech Tips: घरातील जुन्या USB केबल कचऱ्यात फेकताय? थांबा... जाणून घ्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत
मिळालेल्या माहितीनुसार, यूएसबी केबलमध्ये कॉपर, एल्युमिनियम, प्लास्टिक आणि इतर धातूंचा वापर केला जातो. जर तुम्ही सामान्य कचऱ्यात या यूएसबी केबल फेकल्या तर त्या लँडफीलमध्ये जाऊन दिर्घकाळापर्यंत खराब होत नाहीत. याशिवाय जर तुम्ही या केबल चुकीच्या पद्धतीने फेकल्या प्लास्टिक आणि धातूमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचू शकते. जर एखादी जुनी केबल तुटलेली असेल किंवा आतून खराब झाली असेल आणि तरी देखील या केबलचा वापर केला जात असेल तर शॉर्ट सर्किट, डिव्हाईस खराब होणं किंवा गरम होणं यासांरख्या समस्या निर्माण होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
जर तुमच्याकडे एखादे जुने यूएसबी केबल असेल आणि तुम्हाला तिचा पुन्हा वापर करायचा असेल तर सर्वात आधी ती केबल योग्य प्रकारे काम करत आहे की नाही याची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरील आवरण फाटलेले नाही ना, केबलची तार बाहेर आली नाही ना किंवा कनेक्टरमध्ये काही समस्या आहेत का याची तपासणी करून घ्या. जर असे काही आढळले तर केबलचा वापर करू नका. यामुळे फोन लॅपटॉप आणि इतर गॅजेट्सचे नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञ नेहमी सल्ला देतात की, यूएसबी केबल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक सामान किंवा ॲक्सेसरीज कचरा पेटीत टाकू नका. यूएसबी केबल देखील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा एक भाग मानला जातो. या केबल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट ई-वेस्ट कलेक्शन सेंटर किंवा रजिस्टर्ड रिसायकलिंग सेंटरपर्यंत पोहोचवणे एक चांगला निर्णय मानला जातो.
यूएसबी केबलमध्ये असलेल्या तांब्यासारख्या किंमती धातूंना रिसायकलिंग करून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे नवीन धातूची गरज पडत नाही, एनर्जी वाचते, आणि पर्यावरणावरील दबाव देखील कमी होतो. योग्य प्रकारे रिसायकलिंग केल्यास इलेक्ट्रॉनिक कचरा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळू शकते.
प्रत्येक जुने केबल खराब नसते. जर तुमच्या घरातील एका कोपऱ्यात पडलेले यूएसबी केबल योग्य प्रकारे काम करत असेल तर तुम्ही त्याला सेकंडरी चार्जिंग केबलच्या स्वरूपात घरात ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये वापरू शकता. तसेच तुम्ही केबल गरजू लोकांना देखील देऊ शकता. यामुळे नवीन केबल खरेदी करण्याची गरज पडत नाही आणि ई वेस्ट देखील वाढत नाही.
बिल भरणं तुमच्याही लक्षात राहत नाही का? चिंता करू नका, फोनपे-गुगल पेवर असा सेट करा UPI ऑटोपे
काही युएसबी केबल केवळ चार्जिंगसाठीच नाही तर डेटा ट्रांसफर करण्यासाठी देखील वापरल्या जातात. जर एखाद्या जुन्या यूएसबी केबलचा वापर डेटा ट्रांसफर करण्यासाठी केला गेला असेल तर ही केबल फेकण्यापूर्वी त्याच्यासोबत कोणते ड्राईव्ह किंवा स्टोरेज डिव्हाईस जोडलेले नाही ना याची खात्री करा.
जर यूएसबी केबलला चार्जर एडॉप्टर, प्लास्टिक टाई किंवा दुसऱ्या कोणत्या अॅक्सेसरीज जोडलेली असेल तर केबल सेंटरमध्ये देण्यापूर्वी या अॅक्सेसरीज काढयला विसरू नका. यामुळे रीसाइक्लिंग प्रोसेस आणखी सोपी होईल आणि वेगवेगळे मटेरियल योग्य पद्धतीने प्रोसेस केले जाऊ शकते.






