Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: कमी बजेटमध्ये मिळवा टर्बोचा दम! भारतातील ‘या’ ५ SUV तुमचा ड्रायव्हिंग अनुभव बदलणार

5 Affordable Turbo Petrol SUVs in India: भारतीय बाजारात टर्बो पेट्रोल इंजिन असलेल्या कॉम्पॅक्ट SUV ची मागणी वाढत आहे. दमदार पॉवर, चांगला पिकअप आणि शानदार ड्रायव्हिंग अनुभव देणाऱ्या पाच परवडणाऱ्या SUV ची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 01:25 PM
5 Affordable Turbo Petrol SUVs in India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

5 Affordable Turbo Petrol SUVs in India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भारतातील ५ परवडणाऱ्या Turbo Petrol SUV ची माहिती.
  • महिंद्रा XUV 3XO सर्वाधिक पॉवरफुल पर्याय.
  • मारुती फ्रॉंक्स सर्वात स्वस्त टर्बो SUV.

आजकाल लोकांना साधं पेट्रोल इंजिन नकोय, सगळ्यांना टर्बो पाहिजे. कारण टर्बोमध्ये छोटं इंजिन असून पण पॉवर खतरनाक असतो. पिकअप एकदम जोरदार असतो. जर तुम्ही पण अशीच एखादी कॉम्पॅक्ट SUV शोधत असाल, तर मी तुम्हाला 5 बेस्ट गाड्या सांगतो.

1. ह्युंदाई व्हेन्यू – सगळ्यांची लाडकी

ह्युंदाई व्हेन्यू तर सगळ्यांनाच माहिती आहे. तिच्या लूकमुळे आणि टर्बो इंजिनमुळे ती खूप विकली जाते. यात 1.0 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क देतं. चालवायला एकदम मजा येते.यात तुम्हाला 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT ऑटोमॅटिक असे दोन ऑप्शन मिळतात. किंमत 9.99 लाखांपासून सुरू होते. 5 Affordable Turbo Petrol SUVs in India:
फायदे काय? – डिझाइन एक नंबर आहे, फीचर्स भरपूर आहेत, इंजिन पॉवरफुल आहे.
तोटे काय? – किंमत थोडी जास्त वाटते, मागच्या सीटला थोडी कमी जागा आहे.

2. किआ सोनेट – फीचर्सचा बादशाह

किआ सोनेट दिसायला थोडी व्हेन्यूसारखीच आहे, पण तिच्यात फीचर्स जास्त आहेत. हिच्यात पण तेच 1.0 लिटर T-GDi टर्बो इंजिन आहे, 118 bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क. गिअरबॉक्स पण सेम आहे, iMT आणि DCT.याची किंमत 9.19 लाखांपासून सुरू होते, म्हणजे व्हेन्यूपेक्षा थोडी स्वस्त. आतमध्ये बोसचा म्युझिक सिस्टिम, वेंटिलेटेड सीटसारखे भारी फीचर्स मिळतात.
फायदे – फीचर्स भरपूर, इंजिन चांगलं.
तोटे – मागची सीट तितकी आरामदायक नाही, इंटिरियरमध्ये आता काही नवीन वाटत नाही.

भारतात पुढील 12 महिन्यांत येणार 7 नवीन कॉम्पॅक्ट SUV; मारुती, रेनॉल्टसह फोक्सवॅगनची तयारी!

3. महिंद्रा XUV 3XO – सगळ्यात जास्त पॉवरफुल

महिंद्राची ही नवीन XUV 3XO तर धमाका आहे. कॉम्पॅक्ट SUV मध्ये सगळ्यात जास्त पॉवर हिच्यात आहे. यात 1.2 लिटरचं T-GDi इंजिन आहे जे 128 bhp पॉवर आणि 230 Nm टॉर्क देतं. म्हणजे हिला चालवताना खरी SUV चालवल्यासारखं वाटतं.सध्या हिला 6 स्पीड मॅन्युअल मिळतं. किंमत 7.99 लाखांपासून सुरू होते, जे या पॉवरच्या मानाने एकदम बेस्ट डील आहे.

फायदे – पॉवर एकदम जबरदस्त, आतमध्ये स्पेस खूप आहे, फीचर्स पण भरपूर.
तोटा – मागचा लूक अजून थोडा सुधारायला हवा होता.

4. टाटा नेक्सॉन – सेफ्टीसाठी नंबर 1टाटा नेक्सॉन ही सेफ्टीसाठी प्रसिद्ध आहे.

5 स्टार रेटिंग आहे. यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जे 118 bhp आणि 170 Nm टॉर्क देतं. ही गाडी मजबूत आहे आणि स्पेस पण चांगला आहे.किंमत 8.99 लाखांपासून सुरू होते. फॅमिली मॅनसाठी एकदम योग्य गाडी आहे.
फायदे – सेफ्टी, स्पेस, पॉवर.
तोटे – थोडं डिझाइन आता जुनं वाटतं, इंजिन थोडं आवाज करतं.

महाराष्ट्रात तयार होणार इटालियन बाईक! Moto Guzzi Trip 500 सादर, Aprilia 457 चे इंजिन मिळणार

5. मारुती फ्रॉंक्स – बजेटमध्ये बेस्ट

जर तुमचं बजेट कमी असेल तर फ्रॉंक्स बघा. ही दिसायला खूप स्टायलिश आहे. यात 1.0 लिटर बूस्टरजेट टर्बो इंजिन आहे जे 99 bhp पॉवर आणि 148 Nm टॉर्क देतं. पॉवर बाकीच्यांपेक्षा कमी आहे, पण मायलेज चांगलं मिळतं.किंमत फक्त 7.52 लाखांपासून सुरू होते. म्हणजे टर्बो SUV घ्यायची असेल तर सगळ्यात स्वस्त ऑप्शन हाच आहे.
फायदे – डिझाइन सुंदर, फीचर्स चांगले, किंमत कमी.
तोटा – बॉडी थोडी हलकी वाटते.
तुम्हाला पॉवर पाहिजे असेल तर XUV 3XO घ्या, फीचर्स पाहिजे असतील तर सोनेट किंवा व्हेन्यू, आणि बजेट कमी असेल तर फ्रॉंक्स एकदम बेस्ट आहे.

Web Title: Best affordable turbo petrol suvs in india venue sonet xuv 3xo nexon fronx rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Hyundai
  • Mahindra
  • SUV cars
  • Tata

संबंधित बातम्या

भारतात पुढील 12 महिन्यांत येणार 7 नवीन कॉम्पॅक्ट SUV; मारुती, रेनॉल्टसह फोक्सवॅगनची तयारी!
1

भारतात पुढील 12 महिन्यांत येणार 7 नवीन कॉम्पॅक्ट SUV; मारुती, रेनॉल्टसह फोक्सवॅगनची तयारी!

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास
2

Hyundai Ioniq P A New Chapter: कार खरेदीदारांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार, पाहा काय आहे खास

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: बजेट १२ लाखांपर्यंत? स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स असलेल्या ५ SUV पाहा!
3

Best SUVs Under Rs 12 Lakh in India: बजेट १२ लाखांपर्यंत? स्टायलिश लूक आणि दमदार फीचर्स असलेल्या ५ SUV पाहा!

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे
4

JSW मोटर्सच्या 3 नवीन SUV भारतात येणार! कॉम्बॅट, J5 आणि V23 ची तयारी; जाणून घ्या सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.