(फोटो सौजन्य-AI एआय)
मोटोजीझी Trip 500 मध्ये एप्रिलिया RS 457 आणि Tuono 457 मध्ये वापरण्यात येणारे 457cc लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जवळपास 48 hp पॉवर जनरेट करते. एप्रिलिया RS 457 मध्ये हेच इंजिन 47.6 hp पॉवर आणि 43.5 Nm टॉर्क देते. पण Trip 500 मध्ये कमी RPM वर सहज टॉर्क मिळण्याच्या दृष्टीने इंजिनचे ट्युनिंग करण्यात आले आहे. यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो. युरोपमधील A2 लायसन्सच्या नियमांनुसारही या बाईकची पॉवर ठेवण्यात आली आहे.
Toyota Innova Hycross Facelift 26 नोव्हेंबरला होणार लाँच! नवीन डिझाइनसह फ्लेक्स-फ्युएल हायब्रिड मिळण्याची शक्यता
डिझाइनच्या बाबतीत कंपनीने आपल्या पारंपरिक ट्रान्सव्हर्स V-Twin इंजिनपासून वेगळा मार्ग स्वीकारला आहे. या बाईकमध्ये गोल LED हेडलॅम्प, मेटल फ्युल टँक, ब्लॅक फिनिश इंजिन आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. हेडलॅम्पवर कंपनीचे ईगल चिन्ह दिसते, तर सीटवर The Trip अशी खास एम्ब्रॉयडरी आहे. फ्युल टँकची कॅपसिटी 15 लिटर आहे.
या रोडस्टरचे वजन 180 किलो असून सीट हाइट 790mm आहे. टेक्नोलॉजीच्या बाबतीत Ride-by-Wire थ्रॉटल, Road, Sport आणि Rain असे 3 रायडिंग मोड्स मिळतात. यामध्ये 3.6-इंच गोल TFT डिस्प्ले असून स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि पिक्टोग्राम नेव्हिगेशनची सुविधाही आहे. क्विकशिफ्टरचे फीचर अॅक्सेसरी म्हणून मिळणार आहे. याशिवाय बॅकलिट स्विचगियर आणि फुल LED लाइटिंग देण्यात आली आहे.
मोटोजीझी Trip 500 Black Metropolis, Green Grove आणि Red Beat अशा 3 रंगांमध्ये विकली जाणार आहे. The Opening नावाची खास एडिशनही सादर केली जाणार आहे. या बाईकचे प्रोडक्शन महाराष्ट्रात होणार असले तरी भारतात विक्रीसाठी ती आणली जाणार का, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतीय बाईकप्रेमींचे लक्ष आता कंपनीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: Moto Guzzi Trip 500 चे प्रोडक्शन कुठे होणार आहे?
उत्तर: या बाईकचे प्रोडक्शन महाराष्ट्रातील बारामती येथील पियाजिओच्या प्लांटमध्ये केले जाणार आहे.
प्रश्न 2: Moto Guzzi Trip 500 मध्ये कोणते इंजिन मिळते?
उत्तर: या बाईकमध्ये 457cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन जवळपास 48 hp पॉवर जनरेट करते आणि त्यासोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.
प्रश्न 3: Moto Guzzi Trip 500 भारतात लाँच होणार आहे का?
उत्तर: सध्या भारतातील लाँचबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. या बाईकची युरोपमधील विक्री 2027 च्या सुरुवातीला सुरू होणार आहे.






