
Jio Recharge Plan: फ्रीमध्ये पाहा IND W vs SA W फायनल! जियो यूजर्ससाठी हा आहे बेस्ट रिचार्ज प्लॅन
भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यामध्ये आज आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या मॅचचे आयोजन नवी मुंबईच्या डी.वाई. पाटिल स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. थोड्याच वेळात ही मॅच सुर होणार आहेत. तुम्हाला देखील ही मॅच लाईव्ह पाहायची असेल आणि तुमच्याकडे स्टेडिअमचे तिकीट नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही JioCinema किंवा Disney+ Hotstar वर घरबसल्या लाईव्ह मॅचचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला JioCinema किंवा Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार नाही. तुम्हाला घरबसल्या फ्रीमध्ये JioCinema किंवा Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
जिओ त्यांच्या युजर्ससाठी काही असे रिचार्ज प्लॅन ऑफर करतो. ज्यामध्ये युजर्सना JioCinema किंवा Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळते. ज्यामुळे युजर्सना केवळ एका रिचार्ज प्लॅनमध्ये इतर फायद्यांसह JioCinema किंवा Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन देखील मिळते. ज्यामुळे युजर्स घरबसल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा अंतिम सामना पाहू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – X)
जिओने त्यांच्या क्रिकेट फॅन्ससाठी खास 949 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची व्हिलीडिटी 84 दिवसांची आहे. जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB हाई-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा ऑफर केली जाते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये Jio Hotstar चे सब्सक्रिप्शन पूर्णपणे मोफत ऑफर केले जात आहे, जे तुम्ही मोबाईल किंवा टिव्हीवर लॉगिन करू शकता. या प्लॅनध्ये Jio TV चे फ्री एक्सेस देखील दिले जात आहे.
जर तुमच्याकडे 5G फोन असेल आणि तुम्ही 5G नेटवर्क कव्हरेज असलेल्या क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला या प्लॅनसह अमर्यादित 5G डेटा देखील मिळणार आहे, ज्यामुळे हा रिचार्ज प्लॅन आणथी खास बनतो. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा अंतिम सामना पहायचा असेल, तर तुम्ही 100 रुपयांचा फेस्टिव्ह अॅड-ऑन पॅक देखील घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला 5 जीबी हाय-स्पीड डेटा आणि 30 दिवसांचे जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळते.
जिओचे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये काय फरक आहे?
प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्ही आधी रिचार्ज करता आणि वापरता, तर पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्ही वापरानंतर बिल भरता.
जिओमध्ये दररोज किती डेटा मिळतो?
बहुतेक प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB, 1.5GB, 2GB किंवा 3GB डेटा दिला जातो.
जिओचे अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन कोणते आहेत?
जिओचे सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्समध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा असते.
जिओ फॅमिली प्लॅन म्हणजे काय?
जिओ फॅमिली प्लॅनमध्ये एकाच खात्यातून एकापेक्षा जास्त यूजर्सना (उदा. कुटुंबातील सदस्यांना) डेटा आणि कॉलिंग शेअर करता येते.