Aadhaar Vision 2032: आता आधार होणार अधिक सुरक्षित, Quantum Technology ची घेणार मदत! UIDAI ने सुरु केली नवीन डिजिटल क्रांती
UIDAI (भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण) ने “Aadhaar Vision 2032” नावाची एक मेगा ब्लूप्रिंट तयार केली आहे, ज्यामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), ब्लॉकचेन, आणि क्वांटम कंम्प्युटिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाला जोडलं जाणार आहे. भविष्यात सायबर गुन्हेगारांपासून आधार सिस्टम सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जगातील सर्वात अॅडवांस्ड डिजिटल आईडी फ्रेमवर्क्स तयार करण्यासाठी हे पाऊल अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.
UIDAI चा उद्देश असा आहे की, येत्या काळात आधार कार्ड केवळ एक ओळखपत्र नसावे याला एक स्मार्ट, सुरक्षित आणि डेटा-सेंट्रिक डिजिटल इकोसिस्टम बनवलं जाणार आहे. या विजनमध्ये तीन प्रमुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, ज्यामध्ये AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस), ब्लॉकचेन, आणि क्वांटम कंम्प्युटिंग यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Facebook)
AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस): AI च्या मदतीने आधार सिस्टम आणखी स्मार्ट बनणार आहे, ज्यामुळे फसवणूक, डुप्लिकेट ओळख आणि चुकीच्या डेटा एंट्रीचा धोका कमी होईल.
ब्लॉकचेन: हे आधार डेटाला एक विकेंद्रीकृत नेटवर्कमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे, ज्यामुळे सेंट्रल सर्वर हॅकचा परिणाम मर्यादित असणार आहे.
क्वांटम टेक्नोलॉजी: भविष्यातील सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ते क्वांटम-रेजिस्टेंट एन्क्रिप्शन प्रदान करेल.
UIDAI ने दावा केला आहे की, Vision 2032 लागू झाल्यानंतर, कोणत्याही भारतीयाची डिजीटल ओळख “क्लोन किंवा हॅक” ने केली जाऊ शकत नाही.
या मोठ्या बदलावर लक्ष ठेवण्यासाठी UIDAI ने एक एक्सपर्ट कमेटी तयार केली आहे, ज्याची अध्यक्षता नीलकंठ मिश्रा करत आहेत. या समितीमध्ये तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रशासनातील अनेक दिग्गजांचा समावेश आहे, ज्यात विवेक राघवन (Sarvam AI), धीरज पांडे (न्युटॅनिक्सचे संस्थापक) आणि प्राध्यापक अनिल जैन (मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी) यांचा समावेश आहे. त्यांचे काम म्हणजे, Vision 2032 चे फाइनल डॉक्युमेंट तयार करणं, जे ठरवेल की पुढील दहा वर्षांत आधार प्रणाली कोणत्या दिशेने जाईल.
UIDAI ने हे देखील स्पष्ट केलं आहे की, नवीन Aadhaar फ्रेमवर्क पूर्णपणे Digital Personal Data Protection (DPDP) Act च्या अनुषंगाने असेल. याचा अर्थ असा आहे की, युजर्सचा डेटा सुरक्षित राहणार आहे, यासोबतच “Consent-based Access” अंतर्गत वापरले जाणार आहे. या विजनचे एक प्रमुख उद्देश्य ‘Trust by Design’ आहे, म्हणजेच अशी एक सिस्टम तयार करणं, ज्यामध्ये यूजरचे त्याच्या डेटावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे आणि कोणत्याही तृतीय पक्षाला त्यावर अनधिकृत प्रवेश नसावा.
आधार कार्ड म्हणजे काय?
आधार कार्ड हा भारत सरकारकडून दिला जाणारा 12- अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे, जो नागरिकांच्या बायोमेट्रिक आणि demographic माहितीवर आधारित असतो.
आधार कार्ड बनवण्यासाठी काय कागदपत्रे लागतात?
पॅन कार्ड किंवा जन्मतारीख दाखवणारे दस्तऐवज, पत्ता पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र, वीज बिल, पासपोर्ट), फोटो आणि बायोमेट्रिक माहिती (आंगठा, डोळ्याचा स्कॅन)
आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय खबरदारी घ्यावी?
आधार नंबर सार्वजनिक ठिकाणी शेअर करू नका. e-Aadhaar PDF पासवर्ड संरक्षित ठेवा. कुणालाही OTP/UIDAI संबंधित माहिती देऊ नका.
आधार कार्ड कुठे वापरता येतो?
बँक अकाउंट ओपन करणे, PAN लिंक करणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, मोबाईल सिम कार्ड रजिस्ट्रेशन, Income Tax रिटर्न सबमिशन, इत्यादी.






