Prepaid vs Postpaid: युजर्ससाठी कोणते रिचार्ज प्लॅन्स ठरतात खरंच पैसेवसूल? बहुतेक लोकांना माहित नाही हे रहस्य
प्रत्येक स्मार्टफोन आणि सिम कार्ड युजरसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते रिचार्ज प्लॅन. प्रत्येक युजर त्याच्या गरजेनुसार रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. काही रिचार्ज प्लॅन पोस्टपेड असतात तर काही रिचार्ज प्लॅन प्रीपेड असतात. दोन्ही रिचार्ज प्लॅन त्यांचे फायदे आणि सीमांसह लाँच केले जातात. मात्र या दोन्हीपैकी युजर्ससाठी कोणता रिचार्ज प्लॅन बेस्ट ठरू शकतो, आणि कोणत्या रिचार्ज प्लॅनमध्ये सर्वात जास्त फायदे लपले आहेत, तुम्हाला माहिती आहे का?
प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्स आधी रिचार्ज करतात आणि त्यानंतर डेटा आणि कॉलिंगसह इतर फायदे वापरतात. प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्स तेवढ्याच कॉलिंग आणि डेटाचा वापर करू शकतात, जितके रिचार्ज प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स तुमच्या खर्चावर पूर्पपणे नियंत्रण ठेवते. जर तुम्हाला लिमीटेड डेटाचा वापर करायचा असेल किंवा तुम्ही ऑफर किंवा पैशांच्या हिशोबाने रिचार्ज करण्याला प्राधान्य देत असाल तर तुमच्यासाठी प्रीपेड प्लॅन एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
याशिवाय, प्रीपेड यूजर्सना जास्त फ्लेक्सिबिलिटी मिळते. ते कोणत्याही वेळी त्यांच्या ऑपरेटरचा प्लॅन बदलू शकतो. याच कारणामुळे भारतात 90 टक्के मोबाईल युजर्स प्रीपेड कनेक्शनचा वापर करतात. तथापि, एक कमतरता म्हणजे रिचार्ज संपल्यानंतर सेवा बंद केली जाते. जर यूजर वेळेवर रिचार्ज करायला विसरला तर तो नेटवर्क किंवा इंटरनेट वापरू शकणार नाही.
पोस्टपेड यूजर्स प्रत्येक महिन्याला बिलच्या हिशोबाने पैसे भरू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय नेटवर्क आणि डेटा कनेक्टिविटीचा वापर करू शकतात. जर तुम्ही ऑफीसच्या कामासाठी किंवा बिझनेसच्या कामासाठी मोबाईल डेटाचा वापर करत असाल तर पोस्टपेड रिचार्ज प्लॅन्स तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.
याशिवाय, पोस्टपेड प्लॅन्समध्ये इतर फायदे देखील ऑफर केले जातात. जसे, ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन (नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार), फॅमिली शेअरिंग डेटा आणि प्रायोरिटी कस्टमर सपोर्ट यांसारख्या सुविधा देखील पोस्टपेड प्लॅन्समध्ये ऑफर केल्या जातात. पोस्टपेड प्लॅन्समध्ये युजर्सना प्रत्येक महिन्याच्या शेवटी ठरावीक बिल भरावे लागते. ज्यामुळे खर्चाचा अंदाज लावणं अतिशय सोपं होतं. परंतु कधीकधी हिडन चार्जेसमुळे किंवा करांमुळे, बिल अपेक्षेपेक्षा जास्त असू शकते. यामुळे तुमच्या खर्चावर अतिरिक्त भार पडू शकतो.
जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि एक चांगल्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर प्रीपेड प्लॅन्सचा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. हे प्लॅन्स तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुम्हाला प्लॅन बदलण्याचे स्वंतत्र्य देते. पण जर तुम्ही वारंवार डेटा वापरत असाल, कॉलिंग तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल आणि तुम्हाला OTT अॅप्सचा आनंद घ्यायचा असेल, तर पोस्टपेड प्लॅन तुम्हाला चांगले मूल्य देईल.
रिचार्ज प्लॅन म्हणजे काय?
रिचार्ज प्लॅन म्हणजे मोबाईल वापरकर्त्यांना कॉलिंग, डेटा, आणि एसएमएस सुविधा मिळवण्यासाठी निवडलेला ठराविक कालावधीचा पॅक.
प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनमध्ये फरक काय आहे?
Prepaid मध्ये युजर्स आधी पैसे भरतो आणि नंतर सेवा वापरतो. Postpaid मध्ये युजर्स आधी सेवा वापरतो आणि नंतर बिल भरतो.
रिचार्ज फेल झाल्यास काय करावे?
जर पैसे वजा झाले पण रिचार्ज झाला नाही, तर 24 तासांत तुमच्या बँकेत पैसे परत येतात किंवा तुम्ही ग्राहकसेवेशी संपर्क साधू शकता.






