एअरटेलचा 799 रुपयांचा प्लॅन (फोटो- सोशल मिडिया)
एअरटेलने आणला ग्राहकांसाठी नवा प्लॅन
भारतातील दुसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी कंपनी
रीचार्ज प्लॅनमध्ये मिळणार खास सुविधा
Airtel ही एक लोकप्रिय टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन रीचार्ज प्लॅन्स, खास ऑफर बाजारामध्ये आणत असते. त्यामध्ये ग्राहकांना अनेक सुविधा मिळतात. एअरटेल (Tech News) भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे. आतासुद्धा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एका नवा रीचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारती एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी खास रीचार्ज प्लॅन घेऊन आले आहे. याची किंमत 799 रुपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 1.5 जीबी डेटा मिळतो. हा प्लान तुम्हाला तब्बल 77 दिवस वापरता येणार आहे. यामध्ये तुम्हाला कॉनकोणते फायदे मिळणार आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.
एअरटेलचा 799 रुपयांचा रीचार्ज प्लॅन
भारती एअरटेलच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज 100 एसएमएस, आणि दररोज 1.5 जीबी डेटा मिनार आहे. याकहा कालावधी 77 दिवस असणार आहे. यामध्ये तुम्हाला काही अतिरिक्त फायदे देखील मिळतात. यामध्ये adobe express premium चा फायदा मिळतो. याशिवाय ग्राहकांना हॅलोट्यूनसचा फायदा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 5 जी चा फायदा मिळणार नाही. 5 जी नेटवर्कचा फायदा केवळ ज्या प्लॅन्समध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो त्याच प्लॅनमध्ये होतो.
TRAI च्या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा
खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्हिआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या ग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने नव्या नियमांचा प्रस्ताव सादर केला आहे. या नव्या नियमांतर्गत टेलीकॉम ऑपरेटर्सना असे बजेट फ्रेंडली मोबाईल प्लॅन्स सादर करावे लागणार आहे, जे केवळ व्हॉईस आणि एसएमएस सर्विसवर फोकस करणार आहे. सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव ‘टेलीकॉम कंज्यूमर प्रोटेक्शन रेगुलेशन, 2026’ मधील सुधारणेचा एक भाग आहे. याचा उद्देश किंमतींमध्ये पारदर्शकता आणणे आणि ग्राहकांना प्लॅन्स निवडण्यासाठी आकर्षित करणं असा आहे.
AI+ चा नवा स्मार्टफोन ठरला चर्चेचा विषय! पावरफुल प्रोसेसर ऑफर करणार दमदार परफॉर्मंस, किंमत ठरली खास
रिपोर्ट्सनुसार, टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सादर केलेल्या प्रस्तावात सांगण्यात आलं आहे की, पूर्वी ऑपरेटर्सना केवळ व्हॉइस आणि एसएमएसचा समावेश असलेले विशेष टॅरिफ व्हाउचर (STV) सादर करण्यात सांगितलं जात असले तरी, बाजारात उपलब्ध असलेले पर्याय अजूनही मर्यादित आहेत आणि डेटाचे फायदे समाविष्ट नसतानाही हे प्लॅन्स अनेकदा अवाजवी दरात मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रायला असे आढळून आले आहे की, सध्याच्या उपाययोजनांमधून अपेक्षित परिणाम मिळालेले नाहीत, त्यामुळे आणखी कठोर मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता आहे.






